तळेगाव दाभाडे :
साधारणपणे राजकीय कारकीर्द ही ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषदेत किंवा अन्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदाधिकारी म्हणून होते परंतु,संजय तथा बाळा भेगडे याला अपवाद ठरले. त्यांची राजकीय कारकीर्द थेट आमदार म्हणून झाली, बाळ्भाऊ जनतेच्या मनातील जननायक म्हटले तरी वावगे ठरू नये.
सर्वसामान्य कार्यकर्ते,नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्या जन मतातून ,जन समर्थन लाभलेले आमदार असा गौरव केला जातोय. लोक हिताच्या व तालुक्याच्या विकासा करिता कधीही राजकीय विचार आड येऊ दिला नाही. दहा वर्षाच्या आमदारकीचा कालखंड त्यापैकी पाच वर्षे विरोधी पक्षात.
पाच वर्षे ही सत्ताधारी पक्षाचे आमदार, मर्यादित कालावधी करिता महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली.बाळाभाऊ प्रत्येक जबाबदारी अत्यंत संयमाने तितक्याच समर्थन व सामंजस्याने पार पाळीत आहे,याचा त्यांचे समर्थक म्हणून आम्हाला स्वाभिमान आहे.
हजोरो कोटी रूपयाचा निधी राज्य सरकारकडुन तालुक्याकरीता आणला. त्यापैकी ९५ कोटी रूपयाचा निधी हा फक्त देहुरोड शहरा करीता खर्च केला. देहुरोड शहराची मुख्य समस्या ही मुंबई पुणे जुना राष्ट्रीय महामार्ग होता. निगडी ते देहुरोड पर्यंत अत्यंत अरूंद व अपघात प्रवण असा हा मार्ग होता. त्या मार्गाचे चौपदरीकरण, देहुरोड शहरातील उड्डाणपूल हा दिलेल्या वेळेत पूर्ण करून देहुरोड शहराची समस्या दूर करणेचा यशस्वी प्रयत्न पूर्ण केला.
प्रामाणिक, निष्कलंक, भविष्याचा वेध घेणारे व्यक्तीमत्व, मी आमदार आहे. मी मंत्री आहे म्हणजे मला सर्व विषयातले सर्व काही समजते अशी भावना बाळा भाऊनी कधीच ठेवली नाही. त्यांच्या स्वभावातला मोकळे पणा त्यांच्याबददल आदर वाढवितो. देहुरोड शहरातील अनेक वार्डमधील अंतर्गत रस्ते हे सिमेंट कॉक्रीटचे करून अंतर्गत ड्रेनेज भुयारी करून दिले, शंकरवाडी हे देहुरोड शहराला लागून असलेली लोक वस्ती अनेक वर्षापासून पाण्यासाठी वंचीत होती त्या वसाहतीकडे स्वतः लक्ष घालून पाणी पुरवठा योजना पुर्ण केली.
आरोग्य सुविधेच्या बाबतीत तर आमदार बाळा भेगडे यांचे योगदान तर न भुता न भविषयती असे आहे. आरोग्य विषयक अनेक सुविधा राज्य सरकारकडे उपलब्ध असतात परंतु सामान्य नागरीका पर्यंत पोहचवुन यशस्वी लोक प्रतिनीधी यशस्वी मंत्री कसा असतो ते दाखवुन दिले.
प्राणघातक कोरोनाच्या संकट आणि त्यावर प्रभावी औषध नसल्यामुळे लॉक डाऊन काळात माजी मंत्री महोदयानी केलेले काम अवर्णनीय आहे .कोरोनाने माणसाला माणसांपासून दुर नेले. परंतु हा माणुस या काळात सर्व सामान्य माणसाच्या जवळ राहीला आधार दिला.
कार्यकत्याच्या सतत संपर्कात राहुन उत्साह निर्माण केला. संकटकाळात हा नेता हा सुखःदुखात सहभागी झाला. जनतेसमोर जावून संवाद साधला .कोरोना हाईल रुग्णालयात जावे लागेल असा कसलाही विचार न करता हा माणुस सातत्याने कार्यकर्ते व जनता यांच्याशी थेट संवाद साधत राहीला, धीर दिला व आधार दिला.
मावळ तालुक्यामध्ये एखादया कॅबिनेट मंत्र्याचे क्षमतेपेक्षा जास्त काम माजी मंत्री बाळा भेगडे यानी केले. एक साध्या शेतकरी कुंटुबातील व्यक्ती लोकाकरीता ज्या पद्धतीने काम करते त्यावेळेस अशा व्यक्तीबददल बोलावे तितेक कमी आहे.
२०१९ च्या निवडणुकीमध्ये माजी मंत्री बाळा भेगडे यांचा पराभव जरी झाला .असला तरी तो पराभवाची अनेक कारणे मीमांसा आहे.
पराभुत झालेल माजी मंत्री यांचेकडे आजही माझे सारखा कार्यकर्ता जरी गेला .तरी सुदधा सलग पाच मिनीटे त्यांचे बरोबर बोलता येत नाही, कारण आजही त्यांचे कार्यालय असो वा निवासस्थान असो तेथे असंख्य कार्यकर्तेचा गराडा राबता असतो.असा सतत माणसाच्या गराड्यात राहणारा हा माणुस आहे.
सलग पाच मिनीटेही बोलता येत नाही कारण पुढे मागे सतत कार्यकर्ते काहीतरी समस्या, तकारी काही विकास कामाची माहीती देत असतात अन हा माणुस प्रत्येक कार्यकर्त्यांचे म्हणने ते नीट समजुन घेत असतात. व त्याला योग्य ते मार्गदर्शन करीत असतो.
असा आमदार लोक प्रतिनीधी म्हणुन मावळ तालुक्याला पुन्हा मिळणार नाही जनतेमध्ये राहणारा ,जनतेच्या समस्या सोडविणारा व जमिनीवर पाय घट्ट रोवून राहणा-या लोकनेत्यास वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.
(शब्दांकन अँड.कैलास पानसरे,देहूरोड)

error: Content is protected !!