लोणावळा:
पोलीस निरीक्षक श्री प्रविण मोरे यांचे आदेशान्वये लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हददीत नववर्ष उत्सव व पर्यटनाचे गर्दीचे अनुशंगाने विशेष मोहीम राबवून शस्त्र बाळगणा-या इसमांचा शोध व माहिती घेण्यात येत होती. त्याप्रमाणे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मौजे देवले भागात एक संशयित इसम बिगरपरवाना अग्निशस्त्र बाळगत असून तो संशवितरित्या फिरत आहे. अशी गोपनीय माहिती मिळाल्याने लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंगलदार यांचे पथक तयार करून व देवले रोडवर सापळा रचुन एका इसमास शिताफीने ताब्यात घतले.


प्रशांत शांताराम आबेकर रा देवले ता मावळ जि पुणे असे त्याचे नाव आहे. त्याची अंग झडती घेतले असता त्याचे कमरेला एक गावठी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतुस आढळून आले. कोठुन आणले असे विचारले असता त्याने अनिकेत अशोक कालेकर रा. पवनानगर ता मावळ जि पुणे यांने दिले काडतुस मिळून आले व आरोपीस पिस्टोल असल्याचे सांगितले. पोलीसांनी त्यास पथकांचे माध्यमातुन शोध घेवुन ताब्यात घेतले अशा दोन आरोपीची नावे प्रशांत शांताराम आबेकर रा देवले ता मावळ जि पुणे व अनिकेत अशोक कालेकर, रा पवनानगर ता मावळ जि पुणे यांना लोणावळा ग्रामिण पोलिसांनी ताब्यात घेवून त्याचे विरूध्द लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १८५. भा.द.वि.का कलम ३४ नुमार गुन्हा दाखल केला असुन तपास व प्राथमिक विचारपुस करून आरोपांना मे जे एम एफ सी कोर्ट वडगाव मावळ येथे हजर केले असता दि ०१/०१/२०२२ रोजी पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. सदर शस्त्र कोठुन आणले, आणण्याचा उददेश काय होता याबाबत तपास करण्यात येत आहे. पोलीस निरीक्षक श्री. प्रविण मोरे यांचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन बनकर करीत आहेत.


पुणे ग्रामिण पोलिस अधिक्षक मा. श्री. डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलिस अधिक्षक मा. श्री. मितेश पटटे, लोणावळा उप विभागीय पोलिस अधिकारी, राजेंद्र पाटील यांचे मार्गदर्शनासली लोणावळा ग्रामिण पोलिस स्टशेनचे पोलिस निरीक्षक प्रविण मोरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश माने, पोलिस उप निरीक्षक सचिन बनकर, अनिल लवटे, सहा फौजदार शांताराम बोकड, पोलिस हवालदार अमित ठोसर, विजय गाले, शकिल शेख, पोलीस नाईक गणेश होळकर, शरद जाधवर, किशोर पवार, पोलीस कॉन्सटेबल सिध्देश शिंदे यांनी केली आहे.

error: Content is protected !!