मावळमित्र न्यूज विशेष:
त्यांची घरची परिस्थिती तशी बेताचीच. पण बेताच्या परिस्थितीशी झुंज देत, झगडत सातत्याने सकारात्मक विचार करीत त्या तरूणाने आपले नाव उद्योग विश्वात कोरायला सुरूवात केली आहे. त्याच्या या यशाला प्रगतीचे पंख असेच जडत जाऊन त्याने उंच भरारी मारावी अशाच शुभेच्छा आजच्या मंगलमय दिनी आप्तस्वकीय आणि मित्र परिवाराच्या वतीने दिल्या जात आहे.
मावळातील मिंडेवाडीतील बळीराम मारूती मराठे असे या तरूण उद्योजकाचे नाव. उद्योजक ही बिरुदावली आज मोठ्या थाटामाटात समाजातून दिली जात असली तरी भूतकाळातील आठवणीना हा तरूण विसरला नाही. आणि विसरता ही येणार नाही. ज्या वयात खेळायचे बागडायाचे त्या वयात हाॅटालात काम करावे लागले. त्याच वयात दूधाचा रतीब घालायला शहरातील उंबरे झिजवावे लागले.कधी कधी हार वेणी गुंफण्यासाठी तासनतास बसावे लागले. बालवयातील कष्टाची ही सवय आणि प्रामाणिकपणाने यशाच्या दिशेने पडलेले हे पाऊल या तरूण सहकारी मित्राच्या यशाचे गमक म्हटले तरी ते वावगे ठरू नये.
परिस्थितीशी झुंज देत हा तरूण कसातरी सातवी शिकला. घरची शेती अन जोडीला दूध व्यवसाय.हीच घरच्या रोजगाराची साधने. ओसाड माळरानावर पावसाच्या पाण्यावरील शेती.घरची परिस्थिती हलाखी असल्याने दगड मातीचे घर.यात या तरूणाचे बालपण गेले. या बालपणात आई वडीलांनी दिलेल्या संस्काराच्या शिदोरीवर कष्टाशिवाय पर्याय नाही या मंत्राने भारावून गेलेल्या या तरूणाने यशाचा पहिला टप्पा गाठला.
बळीरामचे पहिली ते दुसरी या दोन वर्गाचे शिक्षण मिंडेवाडीतील जिल्हा परिषद शाळेत झाले. आणि तिसरी ते सहावीचे शिक्षण चुलत्यांकडे राहून तळेगाव दाभाडे च्या नथूभाऊ भेगडे पाटील प्राथमिक शाळेत झाले.
घरची परिस्थिती हलाखीची असल्याने सातवीचे शिक्षण सोडून पिंपरी तील नेहरूनगर येथे हाॅटेल नोकरी केली. काही महिन्याची नोकरी सोडून यमुनानगर रतीबाचे दूध घातले. त्या पाठोपाठ तळेगावात हारफुले दुकानात नोकरी केली तीही महिना सहाशे रुपये पगारावर.
ही सगळे कामे करता करता आलेल्या अनुभवात खूप काही शिकून घेता आले.हारफुले विकताना ओळखी वाढल्या होत्या,या ओळखीने दूधाचा रतीबाची चार ग्राहक मिळाले.
एक म्हशी वर सुरू केलेला दूध धंदा दिवसेंदिवस वाढत गेला.एक म्हशीवर सुरू केलेला हा व्यवसाय पुढे पंचवीस म्हशी पर्यत पोहचला. सुखाचे दिवस येत होते. खाऊन पिऊन समाधानी असतानाच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वयंपाकाच्या भांड्यात लाडकी लेक प्राजक्ता पडली आणि दुर्देवाने तिचे निधन झाले. हा आघात सहन करण्या सारखा नव्हता. परिणामी दूध धंद्याकडे दूर्लक्ष झाले. आणि त्यात खोट आली. पुन्हा उतरणीचे दिवस येऊ लागले.
तत्पूर्वी मिंडेवाडी परिसरात औद्योगिकीकरण वाढले होते. वाढत्या औद्योगिककरणानुसार व्यवसाय करण्याचा सल्ला मित्रांनी दिला आणि वाॅटर सप्लायचा व्यवसाय सुरू केला,या व्यवसायात यशही मिळाले.व्यवसायात मिळालेल्या यशाच्या उर्मीने लढण्याचे बळ मिळाले. पाहता पाहता व्यवसाय स्थिरस्थावर होऊ लागला. नव्या नव्या आयडिया मिळत गेल्या आणि त्यात यश मिळाले.
यशाची ही कावडे अशीच खुली राहवी अशीच मित्र मंडळीना अपेक्षा आहे.
बळीराम मराठे यांची जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या चरणी प्रचंड श्रद्धा आणि निष्ठा आहे.आपल्या यशाला जगदगुरू संत तुकाराम महाराजांचे आशिर्वाद असल्याचे ते नम्रपणे सांगतात. हे सगळे लेखन प्रपंच करण्याचे कारण,जिवाभावाच्या या सहकारी मित्राचा २९ डिसेंबरला वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या पूर्वेला सर्व मित्र परिवाराच्या वतीने शुभेच्छा देण्यासाठी केलेला हा लेखन प्रपंच आहे.

error: Content is protected !!