टाकवे बुद्रुक:
येथील इंद्रायणी नदी पुलावरील तुटलेले लोखंडी रेलिंगचे कठडे याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग वडगाव मावळ यांच्या डीसाळ कारभारामुळे दुर्लक्षित असलेले कठडे जवळपास मागील एक वर्षापासून दोन्ही बाजूचे लोखंडी रेलिंगचा काही भाग तुडलेल्या अवस्थेत आहे. नागरिकांनी येथील तूटलेले कठडे धोकादायक झाले असल्यामुळे अनेकदा संपर्क साधून संबंधित स्थानिकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांना वारंवार निदर्शनास आणून देऊन देखील याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र सामोर दिसून येत आहे.
दरम्यान या रस्त्यावरून दरोरोज पंधरा ते वीस हजार स्थानिक नागरिक, तसेच औद्योगिक वसाहत टाकवे बुद्रुक येथे कंपनीमध्ये काम करण्यासाठी पाच ते सहा हजार कामगार ये-जा करत असतात त्याच प्रमाणे पुणे जिल्ह्यासह पुणे जिल्ह्याच्या बाहेरील अनेक पर्यटक आंदर मावळ मधील सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधील निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी नाईलाजास्तव या धोकादायक पुलावरून प्रवास करावा लागत आहे .


हि गांभीर्याची बाब असून देखील सार्वजनिक बांधकाम तुटलेल्या कठड्यांकडे दुर्लक्ष करत आहे.
वाहन चालक धोकादायक इंद्रायणी नदी पुलावरून प्रवास करत असताना दोन्ही बाजूने तीव्र उतार असल्यामुळे गाडीचा स्पीड अधिक जास्त प्रमाणात ह्या ठिकाणाहून होत आहे. दरम्यान या ठिकाणी भैरवनाथाचे मंदिर असल्या कारणाने अनेक भक्त भाविक येथे दर्शन घेण्यासाठी थांबत असतात. या ठिकाणी एखादा अपघात होऊन जीवितहानी झाल्यास याला जबाबदार कोण ? याठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरक्षिततेबाबत उपाय योजना होणे गरजेचे असल्याची मागणी टाकवे वडेश्वर गट भाजपा जिल्हा परिषद अध्यक्ष रोहिदास असवले यांनी केली.
मुख्य रस्ता कान्हे फाटा या ठिकाणावरून टाकवे बुद्रुक कडे येताना नदीवरील पुलाच्या भागात रस्त्याचे अंतर अरुंद असल्यामुळे समोरून येणाऱ्या गाडीस साईट देताना कदाचित ड्रायव्हरचे गाडी चालवताना
नियंत्रण सुटल्यास काही अनुसूचित प्रकार होऊन जीवित होऊ शकते, तसेच कंपनीच्या मालाचे लाखो-करोडोचे नुकसान होऊन गाडीचे पूर्णपणे नुकसान होऊ शकते. परिणामी संबंधित खात्याने या ठिकाणी उपाय योजनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे
गायकवाड ट्रान्सपोर्ट बाबाजी गायकवाड म्हणाले.
शासकीय अधिकारांचा निष्काळजी पणा धोकादायक पुलावरून प्रवास करणाऱ्या सर्व वाहक चालकांसह नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सार्वजनिक बांधकाम टिम्म शासन अपघात होण्याची वाट पाहत आहे का ? वाहन चालकांनी संतप्त प्रश्न नवनाथ मोढवे यांनी केला.
दरम्यान,सार्वजनिक बांधकाम विभाग वडगाव मावळ…
मुख्य अभियंता वैशाली भुजबळ यांना या संबंधित माहिती विचारण्यासाठी बऱ्याच वेळा फोनवरती संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी संपर्क न साधला नाही व माहिती न देण्यास पसंती दिली आहे.
तसेच उपअभियंता नंदकुमार खोत यांना बराच वेळा यासंदर्भात अनेक प्रवासी नागरिकानी व वाहक चालकांनी संपर्क साधून या ठिकाणी सुरक्षिततेबाबत उपायोजना बाबत सांगितले असता ढकलाढकल सुरक्षिततेबाबत कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत.

error: Content is protected !!