वराळे :
येथील दत्त मंदिराच्या जीर्णोद्धाराचे भूमिपूजन आमदार सुनिल शेळके,माजी राज्यमंत्री बाळा भेगडे,माजी आमदार दिगंबर भेगडे, जिल्हा बँकचे संचालक माऊली दाभाडे,कृषि व पशुसंवर्धन सभापती-बाबुराव वायकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धनचे सभापती बाबुराव वायकर यांच्या फंडातून मारुती मंदिरासाठी दहा लक्ष रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला.तसेच वराळे गावच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच रखडलेल्या विकासकांमुळे नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेऊन वराळे गावासाठी पन्नास लक्ष रुपयांच्या निधीची घोषणा आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली केली.


पुढील आठ दिवसाच्या आत हा निधी मंजूर केला जाईल असे आश्वासन यावेळी उपस्थित ग्रामस्थांना दिले.
यावेळी जि.प.सदस्य-नितीन मराठे,मा.सरपंच-ज्ञानेश्वर मराठे गणेश मराठे,राम मराठे,शहाजी मराठे,रोहिदास मराठे,बाळासाहेब मराठे,निलेश संभाजी मराठे,कल्पेश मराठे,अतुल मराठे,गणेश थिटे,प्रवीण मराठे
व गावचे सरपंच उपसरपंच ग्रा.पं. सदस्य, सर्व आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामस्थांच्या वतीने विश्वनाथ मराठे यांनी सभापती बाबुराव वायकर यांचे मारुती मंदिरासाठी 10 लक्ष, गावच्या विकासकामांसाठी 50 लक्ष फंड मंजूर केला व यापूर्वी ही रोड साठी 15 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून काम ही पूर्ण झालेले आहे असे एकूण 75 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केल्यामुळे वायकर यांचे आभार मानले.

error: Content is protected !!