कामशेत:
महावीर हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ.विकेश मुथा यांचा वाढदिवस रक्तदान शिबिर ,फिरता दवाखाना लोकार्पण सोहळा , आपत्तीकालीन परिस्थितीत मदतीला धावून आलेल्या तरूणांचा सन्मान,सवलतीच्या दरातील शस्त्रक्रिया सांगता सोहळ्याने संपन्न झाला.
सामाजिक कार्यात अग्रेसर असणा-या डाॅ. विकेश मुथा यांचा वाढदिवस सामाजिक कार्याने साजरा केला जावा या हेतूने सह्याद्री प्रतिष्ठान, छत्रपती शिवाजी महाराज रिक्षा संघटना ,दोस्ती ग्रुप मावळ व महावीर हॉस्पिटल यांच्या वतीने हे उपक्रम राबविण्यात आले.
५१ जणांनी रक्तदान केले असून ४१ जणांच्या सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यात आल्या.तसेच आपत्कालीन परिस्थितीत आग विझविण्यासाठी राबलेले
देवीलाल बांबू,जगू रावल,धनसिंग ओसवाल,धनराज ओसवाल,विदेश देसाई,रितेश परदेशी,शशिकांत खाडेकर,अक्षय परमार,प्रमोद दरडे,महेंद्र टाटिया,गोपी शिंदे,अमित बेदमुथा,कितेश जैन यांचा विशेष सत्कार करण्यात आला.


यावेळी पोलीस निरीक्षक संजय जगताप,शिवसेना तालुकाप्रमुख राजेश खांडभोर,उपविभाग प्रमुख मदन शेडगे, माजीउपसरपंच तानाजी दाभाडे,,शहराध्यक्ष सतीश इंगवले,माजी शहरप्रमुख गणेश भोकरे, संकेत सोनवणे,हर्षल दौंडे,अनिकेत जाधव,सचिन शेंडगे ,अभिमन्यू शिंदे,योगेश खांडभोर,सागर पवार,तानाजी वाघवले,सुभाष रायसोनी,बाळू धाडिवाल,बिपीन बेदमुथा,जितेंद्र रावळ,किसन गायकवाड, कांतीलाल मुथा,कांचेनबेन मुथा,मीना मुथा, रोहिणी मुथा,अंजना मुथा,उपस्थितीत होते. सागर पवार यांनी सहकुटुंब रक्तदान केले. तुंग किल्ल्याच्या संवर्धनासाठी पाच हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.
निलेश मुथा यांनी प्रास्ताविक केले. लक्ष्मण शेलार यांनी सुत्रसंचालन केले. परेश मुथा यांनी आभार मानले.

error: Content is protected !!