मावळमित्र न्यूज विशेष:
रुग्णसेवेचा वसा घेऊन समाजाप्रती असलेली आस्था आपल्या कृतीतून दाखवणारे महावीर हॉस्पिटल चे सर्वेसर्वा डॉ विकेश मुथा. भगवान महावीरांनी घालून दिलेल्या आदर्शावर चालत राहणं. आणि आपलं जीवन हे सेवेसाठी आहे .ती सेवा समाजाप्रती सातत्याने व्यक्त करत राहणे हाच स्वभाव बनलेले डॉ. विकेश .
४२ व्या वर्षात पदार्पण करीत आहे .४१ वर्षाचा भूतकाळ आठवला तरी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत यशस्वी होता येतं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. विकेश. व्यापार करीत असताना प्रतिकूल ओढावली तरी खचुन जायचे नाही अशी जिद्द असलेल्या आई वडिलांच्या संस्काराचा ठेवा त्यांना लाभला.
आई-वडिलांच्या संस्कारातून सातत्याने सकारात्मक विचार करीत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेऊन बी एच एम एस पदवी घेऊन घेतलेले डॉ.विकेश रुग्णसेवेचा महायज्ञ अखंडपणे तेवत ठेवत आहे. मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागातील नाळ जोडलेल्या डॉक्टरांनी ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांवर आपला डॉक्टर ही ओळख त्यांनी निर्माण केली आहे .
खेडोपाडी जाऊन वेगवेगळ्या आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून रुग्णसेवा जपली आहे. वेगवेगळ्या आपत्तीमध्ये परजिल्ह्यात जाऊन सुद्धा नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी विकेश यांनी स्वीकारली. साधुसंत,वारकरी ,शिक्षक, विद्यार्थी यांच्या मोफत आरोग्याची परंपरा त्यांनी जपली आहे .
साधुसंत ,वारकरी ,शिक्षक, विद्यार्थी यांच्यावर मोफत औषध उपचार करण्याची त्यांची ख्याती आहे. कुठला डामडौल , गाजावाजा न करता त्यांची आरोग्य सेवा अविरतपणे सुरू आहे .
जेव्हा भलेभले तज्ञ हात टेकतात. रुग्णांच्या नातेवाईकांशी नीट बोलत नाहीत. फोन उचलत नाहीत. तेव्हा आपला हक्काचा डॉक्टर कोण असा प्रश्न आल्यावर एकच नाव पुढे येतं ते म्हणजे डॉक्टर विकेश. कोरोना संकटाच्या काळात अनेक रुग्णांना व्हेंटिलेटर, ऑक्सीजन बेड, रेमडेसीव्हीर, प्लाझ्मा यासारख्या गरजेच्या बाबी मिळवून देण्यात त्यांचा हातखंडा होता. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत घेऊन माध्यमिक शिक्षण पंडित नेहरू विद्यालय झालेल्या डॉक्टरांचं महाविद्यालयीन शिक्षण लोणावळ्यात आणि वैद्यकीय शिक्षण लोकमान्य मेडिकल कॉलेज चिंचवडला झाले. वैद्यकीय शिक्षण सुरू असतानाच लोकमान्य हॉस्पिटल मध्येच नोकरी सुरू केली
ही नोकरी करीत त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. रूग्ण सेवेसाठी तहान भूक विसरून ते काम करीत आहेत. पुरेशी विश्रांती कधी मिळेल याची शाश्वती नाही तरी ते काम करत आहेत. अशा वेळी अगदी हक्काने त्यांना आता आराम करा अशी सक्त ताकीद द्यावी लागते आणि हे काम त्याच्या होममिनिसटर आणि आई दोघींच करू शकतात आणि ते करतात.
ई एम एस मावळ या संस्थेचे संस्थापक आहेत. समाज कार्यात झटून काम करण्यासाठी त्यांना नटराज कला क्रीडा प्रतिष्ठान या संस्थेने प्रोत्साहित केलं .त्यापाठोपाठ डॉ.विकेश यांनी वेगवेगळ्या सामाजिक संस्था स्थापन करून त्यात हिरीरीने भाग घेतला.


विद्यार्थीदशेत अखिल भारतीय विद्यार्थी सेना, त्यापाठोपाठ नटराज कला क्रीडा प्रतिष्ठान, महादेव सेवा ट्रस्ट ,ज्ञानेश्वरी निरूपण सोहळा समिती ,महावीर पॅरामेडिकल अ‍ॅण्ड नर्सिंग इन्स्टिटय़ूट,कामशेत फेस्टिवल, मावळ तालुका ब्लड डोनर असोशियन ,जागृती संस्था, अशा अनेक सेवाभावी संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष पदावर काम करीत आहेत. जनसेवेचे हे काम सुरु ठेवल्याने दहा वर्षापूर्वी कामशेत ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणूनही त्यांनी काम केले आहे .
त्यांच्या कामाची पावती म्हणून मागील निवडणुकीत त्यांच्या भावजयी अँड.रोहिणी परेश मुथा यांच्या गळ्यात सरपंच पदाची माळ पडली तर यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत डॉ. विकेश यांच्या पत्नी अंजना विकेश मुथा या ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य आहेत. मोठया भावजयी मीना निलेश मुथा शिवसेनेच्या तालुका महिला संघटक आहे.
भगवान महावीरांच्या नंतर सर्वाधिक श्रद्धा आणि निष्ठा आई कांचनबेन मुथा आणि वडील कांतीलाल मुथा यांच्या पायाशी आहे विकेश यांच्या पाठीशी भाऊ निलेश आणि परेश खंबीरपणे उभे आहेत.
यंदाच्या ४१ व्या वाढदिवसानिमित्त मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागात आरोग्याचा महायज्ञ अखंडपणे तेवत राहो यासाठी त्यांनी महावीर हॉस्पिटलचा फिरता दवाखाना सुरु केला .गावोगावी या दवाखान्यातून रुग्णांना उपचार दिले जाणार आहेत .सातत्यानं वेगवेगळ्या संकल्पना राबून त्याचा फायदा सर्वसामान्य रुग्णांना होईल नागरिकांना होईल यासाठी सततची धडपड असणारे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व मुथा सर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

error: Content is protected !!