
तळेगाव दाभाडे:
येथील राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी आगारात दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.एसटी महामंडळातील कर्मचारी गेल्या दोन महिन्यांपासून विविध मागण्यांसाठी काम बंद संपावर असून मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जात आहेत
.एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या वतीने संपातही दर वर्षी प्रमाणे दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कामगारांन मध्ये प्रसन्न वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. या प्रसंगी एसटी कामगारांच्या वतीने जन सेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांचा कृतज्ञता पूर्वक सत्कार करण्यात आला.
एसटी कर्मचाऱ्यांच्या पडत्या काळात किशोर आवारे आमच्या पाठीशी ठाम पणे उभे राहिले , संप काळात आम्हाला दोन वेळ पोटभर जेवण त्यांनी दिले आहे. तसेच महिना भर पुरेल एवढा किराणा माल भरून दिला, संपूर्ण महाराष्ट्रात किशोर आवारे यांच्या सारखे सहकार्य कोणी केले नसेल असे या प्रसंगी दिपक जगन्नाथ दगडखैर अध्यक्ष एसटी कामगार संघ यांनी नमूद केले.
दत्त जयंती निमित्त सकाळी अभिषेक व पूजनाचे आयोजन करण्यात आले होते.
एसटी कामगारांच्या वतीने सुश्राव्य अशा भजनाचे व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दत्त जयंतीच्या आयोजनात एसटी कामगार प्रमोद नखाते, धनंजय मुंडे, बाळासाहेब करवंदे, प्रशांत शेवाळे, पांडुरंग बांदल, रामेश्वर दहिफळे आदींनी सहभाग नोंदवला.
- एका तासात थाळी खाऊन दाखवा, आणि मिळवा बुलेट मिळवा:हाॅटेल शिवराजची खास ऑफर
- राऊतवाडीत गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तु , दप्तर ,वह्याचे वाटप हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचा उपक्रम
- मनसेची आंदर मावळात बैठक
- कुरणवस्तीची शाळा झाडांची शाळा:सरपंच सविता भांगरे
- गरजु मुलांसाठी एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत भोयरे येथील शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप




