कान्हे:
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाअंतर्गत जि.प.प्रा.शाळा,कान्हे येथे झालेल्या मोठ्या गटातील सामान्यज्ञान स्पर्धेत कडधे येथील अक्षय लहू तुपे याने प्रथम क्रमांक मिळवला.यावेळी झालेल्या बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी सभापती ज्योती शिंदे,माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर,माजी उपसभापती शांताराम कदम उपस्थित होते.
सातवीचे वर्गशिक्षक शंकर बगडे यांनी त्याची सामान्यज्ञानाची तयारी करवून घेतली होती.वर्तमानपत्र,पुस्तकवाचन तसेच चर्चेतून त्याने सामान्यज्ञान वाढवण्याचा सराव केला.सामान्यज्ञान चांगले असलेले विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत चमकतात असे मत शिक्षण विस्तार अधिकारी रामराव जगदाळे यांनी व्यक्त केले.
कडधे शाळा ही उपक्रमशील असून अक्षयचे यश हे निश्चितच सुखावणारे आहे अशी प्रतिक्रिया मुख्याध्यापक गणेश कदम यांनी दिली.
तालुकास्तरीय स्पर्धेतील या यशाबद्दल कडधे येथील सरपंच कुसूम केदारी,उपसरपंच बजरंग तुपे,शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मोनाली तुपे,उपाध्यक्षा ,सोनाली तुपे,मा.अध्यक्ष श्री.गोरख खराडे,मा.उपाध्यक्ष नितीन तुपे,शिक्षक धनंजय नवले, संजय ठुले, प्रज्ञा माळी यांनी अभिनंदन केले.अक्षयच्या या यशाबद्दल पवनमावळ परिसरात सर्वत्र कौतूक होत आहे.

error: Content is protected !!