टाकवे बुद्रुक:
महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठल्याने बैलगाडा मालक व शौकिनांनी भंडारा गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला.
गेल्या अनेक वर्षांपासून बळीराजाचा असलेला *लढा अखेर यशस्वी* झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना सशर्त मंजुरी दिली आहे. हा विजय महाराष्ट्रातील बळीराजाचा आणि सर्जा-राजाचा अर्थात शेतकऱ्याला जीव लावणाऱ्या बैलजोडींचा आहे.
टाकवे बुद्रुक येथे फायनल सम्राट नंदू भागुजी असवले, शिवाजी जांभुळकर, नवनाथ आंबेकर, नंदू असवले सुनील आंबेकर, अक्षय असवले, अक्षय पिंगळे, अजिंक्य असवले, विक्रम असवले, शरद कोंडे, किरण असवले, अर्जुन गुनाट, अक्षय शिंदे, यांसह आधी गाडामालक टाकवे बुद्रुक या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यासाठी उपस्थित होते.

error: Content is protected !!