पवनानगर : मराठी तरूणांनी व्यवसायात करिअर करावे असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले यांनी केले
काले येथील दि एम्पायर रेस्टॉरंट,प्रतिक ॲग्रो फुड इंन्डस्ट्रीजचे उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले यांच्या उद्घाटनप्रसंगी आठवले बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा आरपीआयचे अध्यक्ष सुर्यकांत वाघमारे हे होते.
यावेळी पुणे जिल्हा आरपीआयचे अध्यक्ष सुर्यकांत वाघमोरे,संत तुकाराम कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे,जीत आठवले, परसुराम वाडेकर, लोणावळा नगरपरिषेदेचे उपनगराध्यक्ष दिलीप दामोदरे, माजी नगरसेवक सुभाष जाधव, रमेश चिमुरकर, नारायण पाळेकर, शैलेंद्र चव्हाण, स्वप्निल कांबळे, किरण राक्षे, संदीप भुतडा, किसन घरदाळे,गणेश गायकवाड, आनंद रोकडे, अशोक कांबळे , विजय कालेकर,अशोक शेडगे, बबन कालेकर,बाळासाहेब भागवत’ राकेश मंदाडे प्रदीप कांबळे
कैलास गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते


पुढे बोलताना आठवले म्हणाले की,मराठी तरुण व्यावसायायातह उतरायला घाबरतो त्याचे कारण त्यामध्ये व्यायवसायामध्ये निर्माण झालेली भिती त्यामुळे आपला तरुण मागे राहतो त्यामुळे तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता व्यायसायात लक्ष घालून तो मोठा करण्यासाठी प्रयत्न करावेत
यावेळी बोलताना सुर्यकांत वाघमारे म्हणाले की,भालेराव यांनी शांताई गार्डन या हॉटेलपासून व्यवसायाला सुरूवात केली होता त्यांनंतर शांताई मंगल कार्यालय उभारुन अनेक गोरगरीब नागरिकांसाठी अल्पदरात उपलब्ध करून दिली.आत्ता प्रतिक ॲग्रो फुड इंन्डस्ट्रीजचे माध्यामातून नवीन व्यावसाय प्रगतीपथावर जाईल यात शंका नाही.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मण भालेराव ‌यांनी केले, सुत्रसंचालन अतुल सोनवणे यांनी तर आभार राहुल सोनवणे यांनी मानले.

error: Content is protected !!