डोणे:
लोकनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष,माजी केंद्रीय कृषिमंत्री, पद्मविभूषण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब व संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब (अण्णा) भेगडे यांच्या वाढदिवसा निमित्त डोणे येथे किर्तन सोहळा संपन्न झाला.
आमदार सुनिल शेळके व ज्येष्ठ नगरसेवक किशोर भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.
सोहळ्यातील भक्तीच्या महापुरात भाविक डुबून गेले. संत साहित्याचे गाढे अभ्यासक ह.भ. प शंकर महाराज शेवाळे यांच्या किर्तनात भाविक रंगून गेले.


संताच्या अभंगाचे संताचे अभंगाच्या ओव्या आणि माऊली तुकारामाच्या जयघोषात परिसर दुमदुमून गेला. टाळ विणा मृदंगाच्या गजरात सारे विठ्ठल भक्त ज्ञानबा तुकाराम गजर होते.
या किर्तन सोहळ्यास पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशोक कारके ,अनिल घारे, नामदेव दामू घारे, ,नामदेव भिकाजी घारे, वसंत काळभोर,दत्तोबा घारे,विलास खिलारे, विलास घारे ,बबन जंगम, सहादु घारे,भाऊ कोंडे, राजू घारे ,रामभाऊ वाडेकर, राजू वाडेकर ,गणेश वाडेकर ,संजय कारके,कुलदीप घारे,चंद्रकांत लांडगे आकाश घारे यांच्यासह पंचक्रोशीतील महिला पुरुष युवक उपस्थित होते.डोणूआई भजनी मंडळ, समस्त ग्रामस्थ डोणे, व सर्व भजनी मंडळ व जनसेवक पै दिलीप दादा राक्षे सोशल फाउंडेशन मावळने या सोहळ्याचे आयोजन केले होते

error: Content is protected !!