पवनानगर :
पवनानगर येथील माजी सरपंच व मावळ तालुका आरपीयचे अध्यक्ष लक्ष्मणराव भालेराव यांच्या दि इम्पायर रेस्टॉरंट,प्रतिक ॲग्रो फुड इंन्डस्ट्रीजचे उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. रविवार दिनांक १२.१२.२०२१ला होणार आहे
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा आरपीआयचे अध्यक्ष सुर्यकांत वाघमारे हे असतील तर प्रमुख पाहुणे म्हणून मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे,माजी राज्यमंत्री बाळा भेगडे,मावळचे आमदार सुनील शेळके आदी उपस्थित राहणार आहे.
लक्ष्मण भालेराव यांनी शांताई गार्डन या हॉटेलपासून व्यवसायाला सुरू केला होता त्यांनंतर शांताई मंगल कार्यालय उभारुन अनेक गोरगरीब नागरिकांसाठी अल्पदरात उपलब्ध करून दिले जातात. पवनमावळातील अनेक राजकीय व सामाजिक नागरिकांमध्ये त्यांचा दांडगा संपर्क आहे. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्व पक्षाचे पदाधिकारी ,सरपंच, उपसरपंच व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे.

error: Content is protected !!