वडगाव मावळ:
दिव्य काशी भव्य काशी या ऐतिहासिक श्री काशी विश्वनाथांच्या लोकधामाचा अभूतपूर्व लोकार्पण सोहळा सोमवार दिनांक १३ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शुभहस्ते सकाळी ११ वाजता होणार आहे.
हा सोहळा दूरदर्शन वर लाईव्ह असल्याने त्या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण वडगांव मावळ येथील श्री. पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात करण्यात येणार आहे.
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याची अभूतपूर्व संधी मावळ तालुक्यातील सर्व वारकरी संप्रदायाला मिळणार आहे
हे लाईव्ह प्रक्षेपण मावळ भा ज पा च्या अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे, आध्यात्मिक आघाडी अध्यक्ष सुनील महाराज वरघडे व कार्यक्रम प्रभारी अनंता कुडे यांनी दिली.
श्री ह भ प शंकर महाराज मराठे,माजी राज्यमंत्री बाळा भेगडे,माजी आमदार दिगंबर भेगडे,श्री पोटोबा देवस्थान चे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर,पंढरपूर बांधकाम समिती चे अध्यक्ष माऊली शिंदे ,पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे आदींसह तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी व वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

error: Content is protected !!