नवलाखउंब्रे:
नवलाखउंब्रेतील वाॅर्ड क्रमांक एकच्या सर्वसाधारण महिला जागेतील पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी राजकारणातील गाॅड फादर आणि मित्रांच्या शब्दाला मान देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नेतृत्वाचा मान राखला. राजकारणातील संधी ही सहजासहजी मिळत नाही. खुर्ची ओढून घ्यावी लागते हा अलिखित राजकारणातील नियम.
आणाभाका, शब्द, वचन हे राजकारणातील परावलंबी शब्द, राजकारणातील यश मिळवायला सर्व काही क्षम्य असते असेही आपण ऐकतो. गावपातळीवरील राजकारणात तर सर्वात अवघड, गुंतागुंतीचे तितकेच प्रतिष्ठेचे.

मागील वर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत नवलाखउंब्रेतील सर्वच्या सर्व जागा बिनविरोध करीत मोठा सकारात्मक निर्णय घेण्यात आला होता. यावेळी अनेकांना शब्द व आश्वासने दिली होती.
या आश्वासनानुसार सर्वसाधारण महिला जागेवर यापूर्वी निवडून आलेल्या सदस्यांनी राजीनामा दिला. पोटनिवडणुक लागली. निवडणूक बिनविरोध होईल अशी अपेक्षा सर्वाना असतानाच मावळ तालुका राष्ट्रवादी सेवादलाचे अध्यक्ष जालिंदर शेटे यांनी पत्नी उषा जालिंदर शेटे यांचा प्रतिस्पर्धी उमेदवार अर्ज दाखल केला.मागील वर्षीची सार्वत्रिक निवडणुक बिनविरोध आणि पोटनिवडणूक साठी दोन अर्ज दाखल झाले.सरळसरळ लढतीत विजयी कोण होईल हे मतदारराजाच्या हाती.


पोटनिवडणूक मतदान होणे काही योग्य नाही, यासाठी स्थानिक पातळीवर खलबते झाली, मनधरणी झाली, आश्वासने देऊन झाली.पण कोणीच माघार घ्यायला तयार होईना, निवडणुक होते की काय अशी परिस्थितीत झाली. पण राजकारणात गाॅड फादर आणि मित्र यांचे पाठबळ असले तर यशस्वी होता येते हे राजकारणातील साधे गणित.या गणिताने बिनविरोध निवडणुकीचा तिढा सोडवला.
आमदार सुनिल शेळके व जिल्हा राष्ट्रवादीचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश खांडगे, प्रदेश राष्ट्रवादीचे चिटणीस विक्रम कदम, माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष नरवडे, भाजपाचे युवा नेते रवि शेटे या सगळ्यांच्या शब्दाला मान देत जालिंदर शेटे यांनी पत्नीची उमेदवारी माघारी घेऊन बिनविरोध निवडणुक करण्यासाठी नेतृत्वाचा मान राखला. जालिंदर शेटे यांच्या पक्ष नेतृत्वावरील आदराची किंमत नाकारता येणार नाही, त्यांनाही योग्य वेळी संधी दिली जाईल असा विश्वास प्रदेश चिटणीस विक्रम कदम यांनी ‘मावळमित्र न्यूज ‘शी बोलताना दिला.

error: Content is protected !!