अतिदुर्गम कुसूर शाळेत वह्यावाटप
टाकवे बुद्रुक:
सुंदर हस्ताक्षर हाच खरा दागिना आहे, हा सुविचार फक्त वाचण्यासाठी नसून तो कृतीत आणण्यासाठी सुलेखन या स्तुत्य उपक्रमाची विद्यार्थिनी कास धरावी असे आवाहन मावळ पंचायत समितीचे माजी उपसभापती शांताराम कदम यांनी केले.
आंदर मावळातील अतिदुर्गम कुसूर शाळेत युवा उद्योजक अंकूश तुर्डे यांच्या सौजन्याने वह्यावाटप करण्यात आले.
यावेळी माजी उपसभापती शांताराम कदम बोलत होते.
गट शिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे,बांधकाम अभियंता शिवदे सो.,शिक्षण विस्तार अधिकारी कृष्णा भांगरे,केंद्रप्रमूख रघूनाथ मोरमारे,शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.


शासनाकडून विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात.परंतू ग्रामीण भागात विद्यार्थ्यांचे पालकांच्या अत्यल्प उत्पन्नामुळे वह्यांअभावी शैक्षणिक नुकसान होते.तुर्डेंसारख्या दानशूर व्यक्तींमुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अडथळा दूर होत असून समाजाला अशा दानशूर व्यक्तींची गरज असल्याचे मत गट शिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी व्यक्त केले.
यावेळी कुसूर शाळेच्या दुरुस्तीची पाहणी करुन आवश्यक सुचना देण्यात आल्या.समाजातील दानशूर व्यक्तींकडून अधिकाधिक मदत मिळवून शाळा समृद्ध करण्यावर आमचा भर असल्याची प्रतिक्रिया मुख्याध्यापिका सुजाता भोसले यांनी दिली.
दुर्गम भागातील शाळाही भौतिकदृष्ट्या समृद्ध होत आहेत हे पाहून समाधान वाटत असल्याचे मत माजी उपसभापती शांताराम कदम यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उमेश माळी यांनी केले. आभार सुजाता भोसले यांनी मानले.

error: Content is protected !!