टाकवे बुद्रुक:
कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि ग्रुप ग्रामपंचायत टाकवे बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने टाकवे बुद्रुक येथे आज महिला शिलाई प्रशिक्षण वर्गाची सुरुवात करण्यात आली त्याप्रसंगी टाकवे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायत सरपंच भूषण असवले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. टाकवे बुद्रुक सह तालुक्यातील इतर गावात हे प्रशिक्षण सुरू आहे. यास मोठा प्रतिसाद मिळत आहे
कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून गेली 10 वर्षे सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक, महिला सक्षमीकरण अशा सर्वच क्षेत्रात वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात काम करणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून कोरोनाच्या संकट काळात गरीब, निराधार, बेघर, आदिवासी हजारो कुटुंबाना रेशन वाटप करण्यात आले आहे.


कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात यावर्षी ही संपूर्ण लोकडाऊन लागल्यामुळे बऱ्याच लोकांचे रोजगार गेले, कामधंदे ठप्प झाले याच पार्श्वभूमीवर महिलांना प्रशिक्षण देऊन सक्षम केल्यास उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध होऊ शकते.
कोकण संस्थेच्या माध्यमातून सुरू झालेल्या या उपक्रमाला टाकवे ग्रूप ग्रामपंचायतचे उपसरपंच परशुराम मालपाटे, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामविकास अधिकारी एस. बी. बांगर उपस्थित होते.

error: Content is protected !!