वडगाव मावळ:
अखिल भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष लोकनेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त मुंबई येथे मुख्य सत्कार समारंभ होणार आहे. सदर सत्कार समारंभ व्हर्चुअल रॅली द्वारे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात स्क्रीन वर दाखविण्यात येणार आहे,यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ, युवक, महिला व सर्व फ्रंटल सेलचे पदाधिकारी • तसेच सर्व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांनी केले.
माजी आमदार कृष्णराव भेगडे माजी मंत्री मदन बाफना,आमदार सुनिल शेळके,संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे उपस्थित राहणार आहेत. रविवार, दि. १२ डिसेंबर २०२१ रोजी स. १०.३० ते १ पर्यंत वैशाली मंगल कार्यालय, जुना मुंबई-पुणे महामार्ग, तळेगाव येथे हा कार्यक्रम होणार आहे.

error: Content is protected !!