मंगरूळ:
राजकीय पटलावरील आनंदोत्सव साजरा करताना जिवाभावाच्या सहका-याच्या आठवणीना उजाळा देण्यासाठी हारतुरे आणि पेढे घेत दिवंगत मित्राचे घर गाठून त्याच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सहकारमहर्षी माऊलीभाऊ दाभाडे यांनी मित्राच्या आठवणींना उजाळा दिला .
त्याचे झाले असे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते सहकारमहर्षी माऊलीभाऊ दाभाडे बिनविरोध निवडून आले. तालुक्यातील मान्यवरांसह तरूणानी माऊलीभाऊंचे निवासस्थानी जाऊन अभिनंदन केले. या सगळ्यांच्या शुभेच्छा स्वीकारून झाल्यावर माऊलीभाऊ दाभाडे यांनी जीवाभावाचे सहकारी दिवंगत नेते शिवाजीराव पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला,आणि आपला मित्र सहकारी या विजयात सहभागी नसल्याची खंत व्यक्त केली
सहकारमहर्षी माउली भाऊ दाभाडे व मंगरूळचे माजी सरपंच दिवंगत नेते शिवाजीराव पवार जीवाभावाचे सहकारी.सहकारमहर्षी माऊलीभाऊ दाभाडे यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेले शिवाजीराव पवार यांचे निधन होऊन काही महिने उलटून गेलेत. पण माझ्या विजयात सहभागी होयला माझा शिवबा नाही याची सल माऊलीभाऊच्या मनात बोचणे स्वाभाविकच आहे
भाऊंची बँकेवर बिनविरोध निवड झाली.
आपल्या विजयामधे शिवाजी पवार ( कारभारी) हा सामील नाही याची भाऊंना खूप खंत वाटली आणि भाऊ आपल्या जीवा भावाचा सहकारी त्याला भाऊ लाडाने (शिवबा ) म्हणायचं आज त्याला भेटाय आले.
आणि शिवाजीदादांच्या फोटो ला हार व पेढे घेऊन आणि म्हणले तुझा विजय झाला शिवबा, व त्यांना अश्रू अनावर झाले . पण भाऊ आम्ही तुम्हाला एक शब्द देतो की जशे दादा तुमच्या मागे होते तशे आम्ही तुमच्या मागे सदैव आहोत अशा विश्वास पवार कुटुंबियांनी भाऊंना दिला.

error: Content is protected !!