टाकवे बुद्रुक :
बेलज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय व्यवस्थापन समितीची नव्याने स्थापना करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेचे काम पंचायत समितीम विस्तार अधिकारी रामराव जगदाळे , विस्तार अधिकारी कृष्णा भांगरे, केंद्रप्रमुख सचिन आंब्रुळे यांनी पाहिले . अध्यक्षपदी राघू विठ्ठल मोरमारे तर उपाध्यक्ष काशिनाथ रघुनाथ दगडे यांची निवड करण्यात आली.
पालकांमधून प्रत्येक वर्गानुसार सदस्य उमाकांत मदगे, सुखदेव गवारी, नितीन ओव्हाळ,माजी सरपंच बाळासाहेब कोकाटे, शिवाजी कोकाटे, सुनिता गवारी,सुनिता मोरमारे, जयश्री वाजे, कविता गवारी सदस्य, सारिका कोकाटे,आशा मदगे,दरम्यान मंगेश लांघी यांची शिक्षणतज्ञ व स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली.


यावेळी फळणे येथील जि.प. शाळेचे शिक्षक अजय शेळवणे, माजी उप सरपंच सतू दगडे, ग्रामपंचायत सदस्य आशा मदगे, जयश्री वाजे, मधुकर कोकाटे,माजी ग्रा. सदस्य सारिका कोकाटे,कविता गवारी, गणेश ताकदूनदे,माजी अध्यक्ष पप्पू वाजे, पप्पू मदगे,नवनाथ दगडे,संदीप गवरी,लाला कोकाटे, आरती ओव्हळ, यांस आधी पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी मागील शालेय व्यवस्थापन समिती शाळेतील सर्व शिक्षक, पंचायत समिती अधिकारी यांच्यामार्फत नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य यांचा सत्कार शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.

error: Content is protected !!