बारामती:
येथील एम.एस काँलेजमध्ये झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत जिल्हा विभागीय कुस्ती स्पर्धेमध्ये मावळ तालुक्यातील कल्हाटच्या अजित जालिंदर करवंदे या कुस्तीगीराने सुवर्णपदक पटकाविले.अजितला कुस्तीगीराचा वारसा आहे.
अजित वडगाव मावळ येथील श्री. संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे कला,वाणिज्य व बी.बी.ए. महाविद्यालयाचा विद्यार्थी असून त्याने १२५ किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळवले . हरियाणा येते होणाऱ्या आँल इंडिया विद्यापीठ स्तरावरील कुस्ती स्पर्धेत त्याची निवड झाली
अर्जुन वीर पुरस्कार विजेते काकासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अजितचा सराव सुरू आहे.

error: Content is protected !!