नवलाखउंब्रे:
नवलाखउंब्रे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सदस्य पदी विजयाबाई आप्पासाहेब शेटे यांची बिनविरोध निवड झाली. गावच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे अश्विनी विशाल शेटे यांनी राजीनामा दिल्याने सदस्य पदासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत विजयाबाई आप्पासाहेब शेटे यांची बिनविरोध निवड झाली
मागील वर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वानुमते झालेल्या निर्णयानुसार अश्विनी शेटे यांनी विहित वेळेत राजीनामा दिल्याने ही पोटनिवडणूक झाली होती.
अंदर मावळ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी अध्यक्ष स्वप्निल आपासाहेब शेटे यांच्या मातोश्री सौ विजयाबाई आप्पासाहेब शेटे आहे स्वप्निल शेटे हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असून आमदार सुनिल शेळके यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.

error: Content is protected !!