पवनानगर:
आमदार सुनिल शेळके यांच्या विशेष प्रयत्नातून आढे व सडवली येथील नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्या असून या दोन्ही योजनांचे कुलस्वामिनी महिला मंचच्या अध्यक्षा सारिका शेळके यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी मावळ पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके, राष्ट्रवादी महिला काँग्रेस तालुका अध्यक्ष सुवर्णा राऊत, नगरसेविका संगीता शेळके, सरपंच सुनिता ज्ञानेश्वर सुतार, उपसरपंच ज्ञानेश्वर हिंगडे, सरपंच अजित चौधरी, उपसरपंच महेंद्र वाळुंज, संजय गांधी योजना अध्यक्ष नारायण ठाकर, सदस्य अजिंक्य टिळे, माजी सरपंच मनोज येवले, नितीन मुऱ्हे, पोलीस पाटील सुभाष ठाकर, ग्रामपंचायत सदस्य मैना ठाकर, संगिता सुतार, मच्छिंद्र सुतार, भामाबाई सुतार, जालिंदर बोत्रे, नवनाथ साळुंके, रेखा थोरवत, कविता शेटे, संगिता गायकवाड, युवराज सुतार, पिंटू तिडके, कल्पेश मराठे,अंकुश कारके आदी मा उपस्थित होते.


मावळ तालुक्यातील प्रत्येक गावतील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी व पिण्याच्या पाण्यासाठीची नागरिकांची वणवण थांबविण्यासाठी आमदार सुनिल शेळके मागील दोन वर्षांंपासून शासनाकडे पाठपुरावा करत असून त्यांच्या यशस्वी पाठपुराव्याने सडवली गावातील योजनेसाठी सुमारे ६८ लक्ष ५८ हजार रुपये, तसेच आढे गावातील पाणीपुवठा योजनेसाठी जल जीवन मिशन अंतर्गत ५७ लक्ष ५५ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.
या पाणी पुरवठा योजनांमुळे आढे व सडवली दोन्ही गावातील सर्व वाड्या वस्त्यावरील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणार आहे .

error: Content is protected !!