टाकवे बुद्रुक :
टाकवे बुद्रुक येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय शिक्षण समिती अध्यक्षपदी अनिल बंडा असवले तर उपाध्यक्षपदी ज्योती शंकर धामणकर यांची सदस्यांमधून बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच सदस्य पदी , विकास असवले,अजित गुणाट,सुप्रिया शिंदे,रुपाली असवले,दिक्षा साबळे, रुपेश असवले,अस्मिता क्षिरसागर, कांता असवले, रुपाली असवले, प्रकाश भोई यांची निवड करण्यात आली.
यावेळी सरपंच भूषण असवले, निवृत्त पोलिस अधिकारी ज्ञानेश्‍वर साबळे, माजी अध्यक्ष चंद्रकांत असवले जि.प.शाळा सर्व शिक्षक मावळत्या अध्यक्ष मनीषा मोढवे, कांता असवले,माजी उपाध्यक्ष सुमित्रा काकरे,कोमल ढोरे, साहेबराव आंबेकर, गणेश काटकर नवनाथ आंबेकर, दत्तात्रय कुंभार, शिवाजी शिंदे, श्रीकांत मोडवे, योगेश मोडवे, योगेश शिंदे, प्रदीप मोडवे, यांसह आदीजन पालक बहुसंखेने उपस्थित होते. मावळत्या शालेय शिक्षण समितीमार्फत, सरपंच भूषण असवले, गावातील मान्यवर व जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक यांच्या मार्फत नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य यांचा सत्कार श्री ज्ञानेश्वरी ग्रथाची प्रत व पुष्पगुच्छ शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला.नवनिर्वाचित अध्यक्ष अनिल असवले म्हणाले,” विद्यार्थ्याच्या सर्वांगिण विकासासाठी पालक,शिक्षक,शाळा व्यवस्थापन समिती व लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत,यासाठी आपल्या सर्वाची गुंफण गुंफून ‘विद्यार्थी केंद्रबिंदू ‘मानून काम करण्याचा आपला मानस हवा,त्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे.

error: Content is protected !!