वडगाव मावळ :
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते, सहकारमहर्षी ज्ञानेश्वर उर्फ माऊलीभाऊ दाभाडे बिनविरोध निवडून आले. सहकारातील माऊलीभाऊ दाभाडे यांचा दबदबा पुन्हा एकदा सिद्ध झाला. भाजपाच्या तीन उमेदवारांना धोबीपछाड करीत दाभाडे बिनविरोध निवडून आले.
अ गट मतदार गटातून माऊली दाभाडे यांच्या सह भाजपने तीन उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक बिनविरोध करू द्यायची नाही असा चंग बांधला होता. पण भाजपाच्या गोटात हालचाली होण्यापूर्वीच दाभाडे यांनी बाजी मारून निवडणुकीचा डाव जिंकला. मावळ मधुन दिलेल्या तिनही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत बाद झाल्याने जिल्हा बँकेच्या संचालक पदी ज्ञानेश्वर उर्फ माऊली दाभाडे यांची बिनविरोध निवड झाली
निवडणुक लढविण्यापूर्वीच भाजपला पुन्हा पराभवास सामोरे जावे लागले असल्याची जोरदार चर्चा राष्ट्रवादीच्या गोटात सूरू आहे. पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकांच्या निवडीसाठी मागील महिन्यात निवडणुक जाहीर करण्यात आली.होती त्यानुसार २९ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करायचे होते व ७ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार होती.


पुणे जिल्हा सहकारी बँकेची निवडणुक जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडी कडून ज्ञानेश्वर उर्फ माऊली दाभाडे यांचा १ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता.या नंतर भाजपकडून अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपल्या उमेदवारचे नाव उघड न करता अचानक ६ डिसेंबर रोजी शैलजा दळवी,शांताराम काजळे, तुकाराम भोईरकर यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यामागे भाजपची या निवडणुकीसाठीची वेगळी रणनीती असल्याच्या मावळात चर्चा सुरु झाल्या होत्या मात्र उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत भाजपणे दिलेल्या तीनही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज बाद झाल्याने भाजपला निवडणुक लढविण्यापूर्वीच पराभवास सामोरे जावे लागले.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी भाजपकडे प्रबळ दावेदार नसल्याने केवळ विरोधाला विरोध दर्शविण्यासाठी उमेदवार देण्याची नामुष्की मावळ भाजपवर ओढवल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मागील महिन्यात पार पडलेल्या पीएमआरडीएच्या निवडणुकीत नगरपरिषदेच्या गटातून पुरेसे संख्याबळ असताना देखील भाजपच्या चुकीच्या रणनीतीमुळे नगरपरिषदेच्या गटातील उमेदवारास पराभवास सामोरे जावे लागले होते.
भाजपचा बालेकिल्ला असलेल्या मावळ तालुक्यात जिल्हा निवडणुकीसाठी मावळ भाजपला प्रबळ उमेदवार देता आले नसल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करून भाजपने दिलेले आवाहन पोकळ ठरले आहे. यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सुरु आहे.

error: Content is protected !!