टाकवे बुद्रुक :
गेले वीस महिने शाळा बंद होत्या आज ग्रामीण भागातील शाळा उत्साहाच्या वातावरणात सुरु झाल्या शिक्षक व मुले यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच भूषण असवले, उपसरपंच परशुराम मालपोटे व ग्रामपंचायत सर्व सदस्य यांनी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प, बिस्किट व कॅप देऊन स्वागत केले. तसेच शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष मनिषा मोढवे व उपाध्यक्ष सुमित्रा काकरे यांनी नविन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. शाळेचे वातावरण एकदम उत्साहमय झाले.
तसेच आज ६ डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असल्याने शिक्षण म्हणजे वाघीणीचे दूध आणि या त्यांच्या शिकवणीची आठवण ठेवत याच दिवशी शाळा सुरु झाल्याने आनंद द्विगुणीत झाला.


डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मा. सरपंच भूषण असवले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी न्यू इंग्लिश स्कूलचे उपमुख्याध्यापक श्री. पंडीत सर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य व विचार आपल्या भाषणात सांगितले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक शिवाजी जरग यांनी प्रास्ताविक केले.
करोनाबाबत मास्क वापर, विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित अंतर, सॅनिटायझस्य वापर यासंबंधी त्याचप्रमाणे आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले सर्व शासकीय नियमांचे पालन करून शाळा सुरु करण्यात आली.
यावेळी सरपंच भूषण असवले, उपसरपंच परशुराम मालपोटे,माजी उपसरपंच ऋषीनाथ शिंदे,माजी उपसरपंच सदस्य अविनाश असवले, सोमनाथ असवले, ज्येष्ठ सदस्य जिजाबाई गायकवाड,माजी उपसरपंच सत्तू दगडे, सुवर्णा असवले, ज्योती आंबेकर, संध्या असवले, प्रतीक्षा जाधव,प्रिया मालपोटे,आशा मदगे, लेखनिक गणेश वाळुंजकर, सुशील वाडेकर उपस्थित होते.
ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ असवले यांनी पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

error: Content is protected !!