मुंबई:
चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीच्या ‘राष्ट्रवादी’ दिनदर्शिकेचे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार याच्या हस्ते ‘देवगिरी’वर करण्यात आले. मागील सात वर्षापासून चिंतामणी ग्रूप ऑफ कंपनीच्या वतीने ‘राष्ट्रवादी ‘दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात येत असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्याची परंपरा आहे.राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थदादा पवार यांच्या हस्ते या वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.


प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे चिटणीस व चिंतामणी ग्रूप ऑफ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विक्रम कदम व कार्यकारी संचालक संतोष(भैय्या)कदम यांच्या पुढाकारातून हा उपक्रम घेतला जातो. चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक विक्रम कदम,कार्यकारी संचालक संतोष(भैय्या)कदम
,राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव रामदास वाडेकर, सोमनाथराव गायकवाड, प्रदेश उपाध्यक्ष एकनारावराव गवळी, राष्ट्रवादी युवकचे कार्याध्यक्ष शिवाजी असवले, राज खांडभोर, अनिल डिखळे साहेब उपस्थितीत होते.
विक्रम कदम म्हणाले,”उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आशीर्वादाने सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबवत आहे. याचा आनंद आहे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वरील निष्ठा व्यक्त करण्याची ही संधी असते.उपमुख्यमंत्री अजित पवार यांंच्या आशीर्वादानेच चिंतामणी ग्रूप ऑफ कंपनी यशस्वी वाटचाल करीत आहे.

error: Content is protected !!