पवनानगर:
मावळ तालुक्यातील कडधे केंद्राची शिक्षण परिषद निसर्गरम्य येलघोल येथे संपन्न झाली.यावेळी कडधे केंद्राचे केंद्रप्रमूख व विस्तार अधिकारी रामराव जगदाळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष एकनाथ घारे,माजी अध्यक्ष राजेंद्र घारे, ग्रामपंचायत सदस्या सीमा शेडगे, मेघा भरणे,रेखा भिलारे, मीनाक्षी घारे आदी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजन करून शिक्षण परिषद उद्घाटन झाले.
शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष राजेंद्र घारे यांनी मनोगत व्यक्त करताना येलघोल शाळेची यशोगाथा कथन केली आणि परिषदेला शुभेच्छा दिल्या. शिक्षण परिषद यशस्वी होण्यासाठी विद्यमान सरपंच जयवंत घारे यांनी मोलाचे सहकार्य केले. कडधे शाळेचे मुख्याध्यापक गणेश कदम, करुंज शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा अरगडे, ज्येष्ठ शिक्षक रामचंद्र गायकवाड , शिक्षक पतसंस्था माजी चेअरमन ज्ञानेश्वर शिवणेकर ,हरिभाऊ आडकर ,शिक्षक भारती जिल्हा अध्यक्ष अंकुश येवले , शिक्षक संघटना मुख्य संघटक संदीप आडकर यांसह कडधे केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते.


या शिक्षण परिषदेत RTE कलमे,मुख्याध्यापक कर्तव्ये,शालेय अभिलेखे,अध्ययन स्तर निश्चिती व कृतीपत्रिका इ.विषयी सविस्तर मार्गदर्शन सुरेश शिवले यांनी केले.शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी व नियोजन याविषयी शंकर बगडे यांनी मार्गदर्शन केले.रामराव जगदाळे यांनी शाळा सुरु होत असताना पाळावयाची शासकीय नियमावली व विद्यार्थ्यांची घ्यावयाची काळजी यांबाबत सुचना दिल्या.यावेळी झालेल्या चर्चेत संजय ठुले,अजय देशमुख,सुनील सानप,सचिन गायकवाड,उषा भोईटे,मंगल शिखरे,अमिता थोरात यांनी सक्रिय सहभाग घेतला.शिक्षण परिषदेचे संयोजन येलघोल शाळेच्या मुख्याध्यापिका वनिता धोंगडी यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संगीता कांबळे यांनी केले.

error: Content is protected !!