वडगाव मावळ:
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोमवारी (दि.६) रोजी उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यात शैलजा ज्ञानेश्वर दळवी, शांताराम लक्ष्मण काजळे, तुकाराम सोनू भोईरकर यांचे उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आले आहे.
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, जिल्हा सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे, पुणे जिल्हा बँकेचे माजी संचालक बाळासाहेब नेवाळे, भाजपाचे तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांच्या उपस्थित उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते माऊली शिंदे, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, शांताराम कदम, उद्धव शेलार, गुलाब म्हाळस्कर, सुनिल चव्हाण, गणेश धानिवले, गणेश ठाकर, बाबूलाल गराडे, अमोल केदारी, प्रदीप हुलावळे, मधुकर शिंदे, धनंजय टिळे, सूर्यकांत सोरटे, गणेश ठाकर, संतोष ठुले, सागर शिंदे, सोमनाथ शिंदे, सरपंच नागेश मरगळे, गोपीचंद गराडे, सुभाष शिंदे, सोमनाथ गराडे उपस्थित होते.

error: Content is protected !!