नवलाखउंब्रे: गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे सर्व प्रकारच्या शाळा,महाविद्यालये बंद होती परंतु कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्यामुळे आज नियमितपणे लहान मुलांच्या प्राथमिक विभागाच्या इयत्ता पहिली ते चौथी शाळा सुरू करण्यात आली.
कुरणवस्ती ( निगडे ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. हा स्वागतोत्सव सोहळा सरपंच सविता भांगरे यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला .

भारतरत्न .डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .कार्यकमास शालेय व्यवस्थापन समिती सदस्य , पालक उपस्थित होते .प्राथमिक विद्यालयातील लहान मुलांचे स्वागत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून पुष्पगुच्छ देऊन औक्षण करुन व खाऊ वाटप करत करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका जयश्री चांदबोधले व सहशिक्षिका रेखा केकाण यांनी केले . अंगणवाडी सेविका रुक्मिणी भांगरे यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली .

error: Content is protected !!