वेल्हे:
स्वातंत्र्याचे जनक व जगाच्या पाठीवर सर्वप्रथम लोकशाहीचा पाया रोवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या जगातील पहिल्या स्वतंत्र राष्ट्र, हिंदवी स्वराज्यातील पहिला तालुका असलेल्या राजगडाचे नाव वेल्हा तालुक्याला देण्यात येणार आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या मागणीला मंजुरी देण्यात आली. आता राज्य सरकार प्रत्यक्ष मागणी मंजूर करून वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका करणार याकडे तालुक्यातील मावळ्यांसह राज्यभरातील शिवभक्तांचे लक्ष लागले आहे.
देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या पहिल्या राजगड तालुक्याचे नाव दिल्यास देशाच्या नकाशात शिवरायांचा राजगड म्हणून विराजमान होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाच्या स्मृतींना उजाळा देऊन प्रखर राष्ट्रीय बाण्याचा जागर व्हावा, यासाठी वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड करण्यात यावे, असे ठराव वेल्हे तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेत मंजूर करण्यात आले. खासदार सुप्रिया सुळे, आमदार संग्राम थोपटे यांनी शासनाला साकडे घालून वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका करण्यात यावे, याकडे लक्ष
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून राजगड तालुक्याचा उल्लेख आहे. शिवरायांच्या महान कार्याचा व वीर मावळ्यांच्या प्रखर स्वराज्यनिष्ठेचा ज्वलंत वारसा राजगडाला आहे. शिवरायांनी स्वराज्याचा राज्यकारभार किल्ले राजगडावरून १६४७ ते १६७२ पर्यंत असा पंचवीस वर्षे पाहिला. राजगड ही जगातील पहिल्या लोकशाहीवादी स्वतंत्र राष्ट्राची पहिली राजधानी आहे.
तालुक्यातील सरपंच, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक, शिवप्रेमींतून ही मागणी जोर धरू लागली होती.
या मागणीसाठी मावळा जवान संघटनेच्या वतीने अनेक वर्षांपासून जनचळवळ सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनासिंहगडावर याबाबत निवेदन देण्यात आले. त्या वेळी उपमुख्यमंत्र्यांनी ग्रामपंचायतीच्या ठराव, शासन दप्तरी असलेले प्रस्ताव पाहून जिल्हा परिषदेचा मागणी ठराव घेऊन तो विभागीय आयुक्तांकडे
सादर करण्याची सूचना केली. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतारे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.
छत्रपती शिवरायांची कर्मभूमी व अठरापगड जातींच्या वीर मावळ्यांची शौर्य भूमी असलेल्या वेल्हे तालुक्यात राजगड, तोरणा किल्ले, ऐतिहासिक वास्तु, मंदिरे, देवराई, मढेघाट अशी प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत. मात्र, अज्ञात पर्यटकांना वेल्ह्यात जायचे म्हटले तर हा तालुका कोठे आहे हेच माहीत नाही. केवळ राजगड व तोरणा अशीच ओळख आहे. वेल्हा गुगलवर सर्च केल्यानंतर अनेक वेळा इतर ठिकाणी दाखवत असल्याने पर्यटकांची गैरसोय होत आहे.
तातडीने कार्यवाही केली. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत महिला बालकल्याण सभापती पूजा पारगे, स्थानिक जिल्हा परिषद सदस्य अमोल
नलावडे, दिनकर धरपाळे यांच्यासह सर्व सदस्यांनी एकमुखाने वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका करण्याचा ठराव मंजूर केला.

error: Content is protected !!