कामशेत :
कामशेत पॅराग्लायडिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी फ्लाय सह्याद्री कंपनीचे सर्वेसर्वा रमेश भुरूक यांची असोसिएशनच्या सदस्यांकडून बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
तसेच उपाध्यक्षपदी- विकास आंद्रे व विनोद शेलार,
सचिवपदी – गणपत नेवाळे, खजिनदार म्हणून गणेश गायकवाड यांची देखील बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे.
यावेळी कमशेत पॅराग्लायडिंग असोसिएशनच्या सदस्यांच्या मिटिंग मध्ये तानाजी टाकवे, पंकज गुगळे, संजय राव, अमरजित मलिक, विजय सोनी, संजय पेंडुरकर यांनी रमेश भुरूक यांचे असोसिएशनच्या अध्यक्ष पदासाठी नाव सुचविले व त्यास असोसिएशनचे सदस्य सनी कोळेकर सचिन जाधव, योगी दाई, रवि शेलार, बाळासाहेब कुढले, गणेश गायकवाड, प्रविण शिंदे, पप्पु शेटे खंडू साबळे, प्रतीक कुटे, सुभाष शेवाळे, बंडु शेलार, संदिप भालशिंगे, नवनाथ पवार, आकाश शेलार, विकास शेलार, गणेश शिंदे, आकाश कोंढरे, जितेंद्र चिंदालिया, अंकुश टाकवे, सोमनाथ कूढले, प्रदिप उंडे, हरिष उंडे, तानाजी कुढले, मोहसिन मुजावर, संतोष पवार, दत्ता केदारी, दत्ता कोंढरे, ओंकार हांडे, सुभाष कोंढरे, प्रविण गायकवाड, सूरज भालशींगे, विनायक सोरकादे, अभि ठाकर, लोकेंद्र कुमार, सागर सिंघ आदींनी अनुमोदन दिल्याने रमेश भुरूक यांची कामशेत पॅराग्लायडिंग असोसिएशनच्या अध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाली आहे.


कामशेत येथील डोंगरावर मागील २५ ते ३० वर्षांपासून पॅराग्लायडिंग हा साहासी खेळ खेळला जात होता.पुढे या साहासी खेळाचे सहासी पर्यटनांत रूपांतर झाले आणि राज्य शासनाने देखील सहासी पर्यटनास मान्यता दिल्याने मावळात पॅराग्लायडिंग च्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार निर्माण होत आहे.
सुरवातीच्या काळात केवळ परराज्यातील व परदेशातील व्यक्तीच याठिकाणी येऊन पॅराग्लायडिंग करत होते.त्यानंतर येथील स्थानिक युवकांनी अथक परिश्रम घेऊन त्यांच्याकडून ही कला आत्मसात करून घेतली आहे. आणि याच माध्यमातून एक उत्तम उद्योगसंधी निर्माण झाली आहे. आणि आज देश विदेशातून हजारो पर्यटन या सहासी खेळाचा आंनद घेण्यासाठी कमशेतला येत आहेत.


पॅराग्लायडिंग हा खेळ खेळत असताना डोंगरावरून उड्डाण घ्यावे लागते. यावर्षी वनविभागाने पॅराग्लायडिंग क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना डोंगरावर जाण्यास मज्जाव केल्याने हा सहासी खेळ बंद झाला होता मात्र आमदार सुनिल शेळके यांच्या मध्यस्तीने वनहक्क समिती स्थापन करून त्यांना करदेशीर प्रवेश देण्यात येणार असून यासर्व प्रक्रियेमध्ये कामशेत पॅराग्लायडिंग च्या माध्यमातून रमेश भुरूक यांनी महत्वाची भूमिका पार पडल्याने त्यांची या असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

error: Content is protected !!