वडगाव मावळ:
पद्मभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांचे वाढदिवसानिमित्त शासकीय विश्रामगृह वडगांव मावळ येथे ‘सायबर क्राइम व वाढती ऑनलाइन गुन्हेगारी ‘ या विषयावर अँड.प्रतिक तेंडुलकर यांचे व्याख्यान झाले. मोठ्या संखेने वकील व नागरिक उपस्थित होते. नागरिकानी ऑनलाइन फसवणूक कशी टाळावी त्यासाठी काय काळजी घ्यावी,मोबाइल व इंटरनेट चा वापर करताना काय काळजी घ्यावी याबाबत मोलाचे मार्गदर्शन त्यानी केले.
या कार्यक्रमाचे आयोजन मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेल यानी केले होते.यावेली पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस लीगल सेल अध्यक्ष अँड दिलीप करंडे , नगराध्यक्ष मयूर ढोरे अँड नामदेव दाभाडे, अँड अशोकराव ढमाले, सविताताई मंचरे, अँड विठ्ठल पिंपळे,अँड शिवदास मोरे, अँड दीपक चौधरी, शैलजा काळोखे,अँड मिनाक्षी ढोरे अँड सुधीर भोंगाड़े, अँड दिनेश शेलार, अँड अमोल दाभाडे, अँड प्रतिक देशमुख , अँड गायत्री रिले, अँड कांचन धमाले, समीर भगत आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड सोमनाथ पवळे यानी केले.अँड अक्षय रौंधळ यांनी आभार.

error: Content is protected !!