वडगांव मावळ:
पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर बारा नख्याचे कासवांची तस्करी करून विक्री करणारा इसमास स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केला आहे.पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पाहिजे फरारी आरोपीचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे यांना गोपनीय बतमीदारामार्फत माहिती मिळाली की,” पुणे-मुंबई रोडवर कान्हे फाटा येथे एक इसम कासवांची तस्करी करून विक्री करण्यासाठी येणार आहे .
या गोपनीय माहितीच्या आधारे कान्हे फाटा येथे सापळा लावून कासवांची विक्रीसाठी आलेल्या या इसमाला ताब्यात घेतले.
राकेश आबाजी पवार वय ३७ रा.कामशेत ता.मावळ जि. पुणे असे त्याचे नाव असून त्याच्या ताब्यातील बकेटमध्ये,बारा नख्यांचे दोन कासव ,असे एकूण ऐंशी हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वनपरिक्षेत्र विभाग वडगांव मावळ यांचे ताब्यात आरोपीस मुद्देमालसह देण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक मा.डॉ. अभिनव देशमुख ,अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके ,
पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे ,सहायक फौजदार प्रकाश वाघमारे,प्राण येवले, काशिनाथ राजापुरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

error: Content is protected !!