पवनानगर – येथील पवना शिक्षण संकुलात राष्ट्रवादी काॕग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधत पवना शिक्षण संकुलातील सर्व विद्यार्थांना वाचनाची आवड निर्माण व्हावी ह्या हेतूने मावळ युवक राष्ट्रवादी काॕग्रेसचे कार्याअध्यक्ष सुनिल भोंगाडे यांनी दोन हजार पुस्तके ग्रंथालयासाठी दिली असून नव्यानेच शरदचंद्रजी पवार पुस्तक पेढी सुरवात झाली आहे.
यावेळी नुतन महाराष्ट्र प्रसारक मंडळाचे सचिव व शालेय समिती अध्यक्ष संतोष खांडगे,राष्ट्रवादी युवक काॕग्रेस कार्याअध्यक्ष सुनिलनाना भोंगाडे, नवीन समर्थ विद्यालय शालेय समिती अध्यक्ष महेशभाई शहा,प्राचार्या अंजली दौंडे,पर्यवेक्षिका निला केसकर,माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष काशिनाथ निंबळे शालेय समिती सदस्य प्रल्हाद कालेकर,नारायण कालेकर,काले सरपंच खंडु कालेकर,उपसरपंच अमित कुंभार,महागाव सरपंच सोपान सावंत ,शाहिदास निंबळे,माजी उपसरपंच संजय मोहोळ,परांजपे विद्यालय मुख्याध्यापक पांडुरंग पोटे,एकविरा विद्यालय मुख्याध्यापक भगवान शिंदे,नंदकुमार धनवे यांंच्यासह पवना शिक्षण संकुलातील सर्व अध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!