नवी दिल्ली:
देशभरात गतवर्षी झालेल्या रस्ते अपघातांमध्ये एकूण १,३१, ७१४ जण ठार झाले. बळींमध्ये २३, ४८३ पादचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी संसदेत दिली. तसेच गत पाच वर्षांत ५२,४७९ किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झाले असून, ५८,४०८ किमीच्या लांबीच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
वर्ष २०१९ च्या तुलनेत २०२० साली रस्ते अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्या पादचाऱ्यांची संख्या घटली.
एकूण रस्ते अपघातातील बळींची संख्यादेखील वर्ष २०१९ च्या १,५१,११३ बळींच्या तुलनेत गतवर्षी १,३१, ७१४ इतकी नोंदविण्यात आल्याचे गडकरी यांनी सभागृहात सांगितले. तसेच रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यासाठी आणि लोकांचा जीव वाचविण्यासाठी
मंजूर करण्यात आलेल्या मोटार वाहन (दुरुस्ती) कायदा आहे. २०१९ साली रस्ते अपघातात २५,८५८ पादचारी ठार झाले होते, तर गतवर्षी २३,४८३ पादचाऱ्यांचा बळी गेला.
नुसार उपाययोजना केल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मात्र पादचाऱ्यांच्या रस्ते अपघातातील मृत्यूबाबत विशिष्ट असा कुठल्याही प्रकाराचा अभ्यास करण्यात आलेला नाही; परंतु सामान्यतः रस्त्याशेजारी चालताना आणि वाहतुकीच्या वर्दळीदरम्यान रस्ता ओलांडताना नियमांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने अशा घटना घडत असतात.
शिवाय सुसाट वेगाने चालवल्या जाणाऱ्या गाड्यादेखील अशा दुर्घटनांसाठी कारणीभूत आहेत. सरकार वाहनांसाठी वेग मर्यादेच्या वेगवेगळ्या श्रेणी निश्चित करत आहे का, या प्रश्नाचे उत्तर देताना गडकरी यांनी असा कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव मंत्रालयाच्या विचारात नसल्याचे स्पष्ट केले.
अन्य एका प्रश्नाचे उत्तर देताना गडकरी यांनी गत पाच वर्षांत ५२, ४७९ कि.मी. लांबीचे राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात आल्याची माहिती दिली. शिवाय गत पाच वर्षांत डोंगराळ आणि सीमावर्ती भागात ४,३५८ कि.मी.च्या राष्ट्रीय महामार्गाची बांधणी करण्यात आली आहे, तर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून (एनएचएआय) २०१७ ते २०१८ पासून वर्ष २०२१-२२ (ऑक्टोबर २०२१ पर्यंत) पर्यंत राष्ट्रीय महामार्गांवर एकूण २२३.९४ लाख झाडे लावण्यात आली आहेत. मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करण्यात आलेल्या ९४ प्रकल्पांतर्गत जवळपास ५५.१० लाख झाडे लावण्यात आल्याचे गडकरींनी सांगितले.

error: Content is protected !!