टाकवे बुद्रुक:
विद्यार्थ्याच्या सर्वांगिण विकासासाठी शिक्षक, पालक व सेवाभावी संस्थेने पुढाकार घ्यावा असे आवाहन टाकवे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच भूषण असवले यांनी केले.
येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील सर्व विदयार्थ्यांना युनिसेफ व उर्मी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ४ थी ते ७ वी पर्यंतच्या सर्व विदयार्थ्यांना साबण, मास्क वाटप करण्यात आले.त्यावेळी सरपंच भूषण असवले बोलत होते.
तसेच नांदी फाऊंडेशन तर्फे नन्ही कली मधील ५० मुलींना शालेय दप्तर, स्वेटर, सॅनिटरी नॅपकिन, वहया, पेन, कंपास चे वाटप करण्यात आले.
मुख्याध्यापक शिवाजी जरग, टाकवे बुद्रुक शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनिषा मोढवे, उपाध्यक्षा सुमित्रा काकरे,माजी शालेय समिती अध्यक्ष चंद्रकांत असवले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
सरपंच भूषण असवले म्हणाले,” दोन वर्षात विद्यार्थ्याचे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे, याचा किती फायदा किती तोटा यावर चर्चा न करता या पुढे विद्यार्थ्याच्या विकासासाठी शिक्षक, पालक व सेवाभावी संस्थेच्या पुढाकारातून विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्नशील असणे आवश्यक आहे.
नांदी फाउंडेशन शिक्षिका शर्मिला गायकवाड म्हणाल्या,” बालवयात केलेले संस्कारक्षम शिक्षणाचा आयुष्यभर उपयोग या दृष्टिकोनातून शिक्षणाची ही नांदी विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल.
विद्यार्थ्यांना या संस्थेमार्फत साहित्य वाटप झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसून येत होता.
शिवशाही मित्र मंडळ अध्यक्ष प्रदीप मोढवे, नांदी फाउंडेशन शिक्षिका शर्मिला गायकवाड, माधुरी जगताप, व इतर त्यांच्या सहकारी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.

error: Content is protected !!