वडगाव मावळ:
ग्रामीण भागातील युवा नेते सर्वसामान्य जनतेच्या मनात अधिराज्य गाजवणारे युवा नेते देवा गायकवाड यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आमदार सुनिल शेळके यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत देवा गायकवाड यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत मागील पंधरवड्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.
मागील चार वर्षात देवा गायकवाड यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवून जनसामान्यात आपली छबी निर्माण केली आहे. ग्रामीण भागातील तरूणात त्याची मोठी क्रेझ आहे. देवदर्शन आणि सहली घडवून त्यानी आपली प्रतिमा तयार केली.भाजपाचा युवा चेहरा असलेल्या देवा गायकवाड यांना राष्ट्रवादीने सन्मानपूर्वक पक्षात घेतले.
आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गायकवाड यांचा पक्ष कार्यालयात सत्कार केला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतर पाटील , ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, विधानसभा उपाध्यक्ष,नरहरी झिरवाळ,आमदार सुनिल शेळके,माजी पंचायत समिती सदस्य दिपक हुलावळे, पुणे नियोजन समिती सदस् नगरसेवक संतोष भेगडे, विद्यार्थी अध्यक्ष नवनाथ चोपडे, संदिप आंद्रे उपस्थित होते.

error: Content is protected !!