वडगाव मावळ:
मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेक मोहरे राष्ट्रवादीत प्रवेश करू लागले आहेत.त्यामुळे मावळ तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद दिवसेंदिवस वाढू लागली आहे. घड्याळ मुक्त मावळची वल्गना करणाऱ्यांसाठी ही मोठी चपराक आहे.निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतील इनकमिंग विरोधकांना धडकी भरवणारे आहे.
मागील दोन वर्षापूर्वी आमदार सुनिल शेळके यांनी हातात राष्ट्रवादीचे घड्याळ बांधून विधानसभेची निवडणूक लढवली. या निवडणुकीत प्रचंड मताधिक्य मिळवून शेळके विजयी झाले.आणि मावळात राष्ट्रवादीचा जोर वाढला.अनेक कार्यकर्त्यांनी आमदार सुनिल शेळके यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपापल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला.
या सगळ्या कार्यकर्त्याची यादी काढली तर ती मारुतीच्या शेपटी प्रमाणे वाढतच जाईल.आमदार शेळके यांनी विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात महामेळावा घेतला
या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश घडवून आणला. याच कार्यक्रमात पवना बंदिस्त जलवाहिनी अंदोलनात जखमी झालेल्यांचा पक्ष प्रवेश करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर उडालेले शिंतोडे पुसून काढले.


यावरच न थांबता आमदार शेळके यांनी भाजपासह काँग्रेसच्या नेते व कार्यकर्त्यांना गळाला लावून राष्ट्रवादीमय केले. कधी काळी मावळात राष्ट्रवादीला घरघर लागली होती. घडयाळ मुक्त मावळची वल्गना केली जात होती.त्या मावळात राष्ट्रवादीचा आमदार लीडने निवडून येणे, दिवसा गणिक राष्ट्रवादीत इनकमिंग सुरू असणे हे राष्ट्रवादीच्या लोकप्रियतेची व कामाची पावती म्हटलं तरी वावग ठरणार नाही .

राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा.ना.जयंतरावजी पाटील, ग्रामविकास मंत्री मा.ना.हसनजी मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच मावळचे आमदार श्री.सुनिल शेळके यांच्या पुढाकाराने लोणावळा नगरपरिषदेतील भाजपचे विद्यमान नगरसेवक श्री.भरतभाऊ हारपुडे, काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका सौ.आरोहीताई तळेगावकर, भाजपचे माजी शहर उपाध्यक्ष श्री.गणेशभाऊ इंगळे, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगरसेवक श्री.चंद्रभान खळदे, देहूगावचे माजी उपसरपंच श्री.स्वप्नील काळोखे, उद्योजक श्री.भरत काळोखे, श्री.अमोल काळोखे यांनी त्यांच्या सहकार्‍यांसह मुंबई प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.
या सर्वांचे पक्षात स्वागत करून पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी, लोणावळा व देहू शहरातील कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!