वडगाव मावळ:
संविधान दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मळवंडी ढोरे या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पोस्टर स्पर्धा इत्यादी स्पर्धेमध्ये प्रत्यक्ष व ऑनलाईन सहभाग घेतला,नैपुण्य दाखवले.
शाळेच्या आवारामध्ये शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सिताराम गायकवाड व बाळासाहेब ढोरे यांच्या शुभहस्ते विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा राऊत यांनी केले. प्रास्ताविक व स्वागत सोमलिंग रेवनशेट्टे यांनी केले. स्पर्धेचे संयोजन शाळेचे मुख्याध्यापक राजू भेगडे यांनी व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन साधना बोराडे यांनी केले.
नेहा ढोरे, कोमल ढोरे, राजकुमार ढोरे, अपूर्वा गायकवाड ऋतुजा ढोरे प्रणाली गायकवाड, अनन्या कांबळे, तनया शिंदे, पुर्वा ढोरे, जान्हवी ढोरे, सृष्टी ढोरे, कोमल ढोरे, सोहम ढोरे इ.विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेमध्ये बक्षिसे मिळवली.

error: Content is protected !!