पुणे:
जिल्ह्यातील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांनी मुख्यालयात थांबावे अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व गटविकास अधिकारी यांना दिल्या आहेत.
सदयस्थितीत निर्माण झालेल्या वातावरणीय बदलामुळे आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होणेची शक्यता असले बाबत या सुचना देण्यात आल्या आहेत. हवामान विभागाचे अंदाजानुसार पुणे व परिसरात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मोठया प्रमाणात पाऊस तसेच वादळी वारा येण्याची शक्यता लक्षात घेता.
बदलत्या हवामानामुळे आपल्या कार्यक्षेत्रात असणारे गावातील घरे, रस्ते व पिकांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तरी पुढील तीन दिवस आपल्या कार्यक्षेत्रातील ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांना मुख्यालय न सोडणेच्या सुचना आपल्या स्तरावरुन देण्यात याव्यात.
तसेच ग्रामस्तरावरील आपत्तीव्यवस्थापन समिती व सरपंच/ग्रामसेवक यांनी संपुर्ण इशारा कालावधीत दक्ष राहुन जबाबदारी व कर्तव्य यांचे पालन करणेत यावे अशा सुचनांचे पत्र देण्यात आले आहे.

error: Content is protected !!