कान्हे:
भारतीय कामगार सेना,स्थानिक प्रतिनिधी मंडळ महिंद्रा सी.आय.ई, कान्हे युनिट यांच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न झाले .
तळेगांव दाभाडे- येथील महिंद्रा सी.आय.ई, या कारखाना आवारात भारतीय कामगार सेना कार्यालयात संघटना सरचिटणीस राज्यमंत्री डॉ रघुनाथ कुचिक यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
स्थानिक कामगार संघटनेचे अध्यक्ष गणेश भेगडे, सरचिटणीस बाळासाहेब सातकर,उपाध्यक्ष काळूराम सातकर,चिटणीस विलास
डेनकर,खजिनदार काळूराम शेडगे,सह खजिनदार संदीप शिंदे, सहचिटणीस नारायण वावरे, कार्यकारिणी सदस्य अनिल जगताप, यांनी या उपक्रमाचे नियोजन केले.


शिबीराचे उदघाटन प्लँटहेड विशाल.मालूसरे , एच आर मँनेजर प्रदिप चौगुले , भारतीय कामगार संघटना युनिट अध्यक्ष गणेश भेगडे यांनी केले .व सर्व युनिट पदाधिकारी तसेच गरवारे रक्त केंद्राचे प्रमुख डॉ. विजयकुमार पोवार, राहूल पारगे उपस्थित होते .
यावेळी कामगार संघटना चे अध्यक्ष गणेशजी भेगडे यांनी आपल्या मनोगतात डॉ रघुनाथ कुचिक साहेब हे स्वतः क्ष किरण तज्ञ आहेत व साहेबांना कोरोना परिस्थिती जी जाणीव आहे यास अनुसरून रक्ताची टंचाई मोठ्या प्रमाणावर आहे म्हणून साहेबांना अभिप्रेत असा रक्तदान शिबिर कार्यक्रम आयोजित करून सर्व कामगार बांधव, अधिकारी यांनी यात सहभाग नोंदवून ७९ जणांनी रक्तदान केले.
खऱ्या अर्थाने साहेबांचा वाढदिवस साजरा झाला असे वाटले. रक्तदान करूया प्रेमाचे नाते जोडुया. असे मनोगत व्यक्त केले. या उक्ती प्रमाणे साहेबांचे वाढदिवस प्रती स्थानिक सर्व प्रतिनिधी यांनी व अधिकारी यांनी साजरा केला, यावेळी सहभागी रक्तदात्यास भारतीय कामगार सेना च्या वतीने दैनंदिन जीवनात रोजच्या वापराचा जेवणाचा डबा भेट देण्यात आला.
एम.आय.एम.ई.आर. वैद्यकीय महाविद्यालय,गरवारे ब्लड बँक,तळेगांव दाभाडे, चे जनसंपर्क अधिकारी राहुल पंढरीनाथ पारगे विशेष सहकार्य लाभले.कार्यक्रम चे प्रास्ताविक व आभार संदीपजी शिंदे यांनी केले .

error: Content is protected !!