कामशेत:
मावळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या युवती आघाडीच्या पदी कांब्रे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुवर्णा गायकवाड यांची निवड करण्यात आली.
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे,तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांच्या हस्ते गायकवाड यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
जिल्हा परिषद सदस्य अलका धानिवले, महिला अध्यक्ष सायली बोत्रे,माजी उपसभापती गणेश गायकवाड, माजी उपसभापती दत्तात्रय शेवाळे,विजय टाकवे,विशाल भांगरे, पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य कुलदीप बोडके, व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!