

पवनानगर:
कोरोनाच्या पाश्वभुमीमुळे दोनवर्ष दिंडी सोहळा झाला नव्हता परंतु यावर्षी कोरोना कमी झाल्यामुळे पवना शिक्षण संकुलात कार्तिकि एकादशी दिवशी हरिनामाच्या जयघोषात टाळ मृदुगांच्या तालात पवना शिक्षण दुमदुमून गेले होते.
या दिडीं सोहळ्याने पवना शाळेला भक्तीमय वातावरणामुळ आळंदीचे स्वरूप आले होते.
या दिंडी सोहळ्यात सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी वारकऱयांची वेषभुषा करून या दिंडीमध्ये सहभागी झाले होते.
संत ज्ञानेश्वर,नामदेव,तुकाराम,मुक्ताबाई या संताच्या वेषभुषा परिधान करून हरिनामाच्या जयघोषात त्यांची पालखीबरोबर मिरवणुक काढण्यात आली होती.
तसेच ह भ प प्रवचनकार बाळासाहेब बोरुडे यांची यावेळी प्रवचनरुपी सेवा संपन्न झाली.
तसेच यावर्षी प्रथमताच या दिंडीमध्ये जलदिंडी,वृक्ष दिंडी,ग्रंथ दिंडी,आरोग्य दिंडी ही शाळेत काढण्यात आली.
सकाळी आठ वाजता डॉ.संजय चौधरी यांच्या हस्ते सपत्नीक माऊलींच्या प्रतीमचे व पालखीचे पुजन करण्यात आले.तसेच ह भ प बाळासाहेब बोरुडे यांच्याहस्ते विना पूजन करण्यात आले.
- एका तासात थाळी खाऊन दाखवा, आणि मिळवा बुलेट मिळवा:हाॅटेल शिवराजची खास ऑफर
- राऊतवाडीत गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तु , दप्तर ,वह्याचे वाटप हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचा उपक्रम
- मनसेची आंदर मावळात बैठक
- कुरणवस्तीची शाळा झाडांची शाळा:सरपंच सविता भांगरे
- गरजु मुलांसाठी एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत भोयरे येथील शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप
यावेळी काले पवनानगर सरपंच खंडु कालेकर,उपसरपंच अमित कुंभार शाळेच्या प्राचार्या अंजली दौंडे , शालेय समिती सदस्य प्रल्हाद कालेकर ग्रामपंचायत सदस्य उत्तम चव्हाण सदस्या आशा कालेकर,छाया कालेकर ,रंजना कालेकर, माजी उपसरपंच ज्ञानेश्वर होजगे,राजेश राऊत,गणेश ठाकर, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थीत होते.
यावेळी ओंकार पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन दत्ता कालेकर,सज्जन बोहरा व मार्च ९९-२००० बॕचच्या वतीने फलोअल्पपोहार सर्व वारकारी विद्यार्थांना देण्यात आले.
दिंडी सोहळ्याचे आयोजन संस्थेचे सचिव व शालेय समिती अध्यक्ष संतोष खांडगे, प्राचार्या अंजली दौंडे,पर्यवेक्षिका निला केसकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी प्रमुख गणेश ठोंबरे व संजय हुलावळे,राजकुमार वरघडे यांच्या सहकार्याने पवना शिक्षण संकुलातील सर्व अध्यापक,अध्यापिका व शिक्षेके-तर कर्मचारी यांनी केले होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक अंजली दौंडे,सुत्रसंचालन भारत काळे यांनी तर आभार महादेव ढाकणे यांनी मानले.





