पुणे:
पुणे जिल्हा परिषद,पुणे व महिला बालकल्याण विभागाच्या वतीने देण्यात येणारा आदर्श अंगणवाडी सेविका,मदतनीस व पर्यवेक्षिका पुरस्कार समारंभ जिल्हा परिषद पुणे येथे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवारयांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
मावळ तालुक्यातील वडगाव मावळ येथील खंडोबा मंदिर अंगणवाडी सेविका अर्चना ढोरे यांना या पुरस्कार पुरस्काराने गौरविण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे,व कृषी सभापती बाबुराव वायकर यांच्या उपस्थिती पुरस्कार देण्यात आला,
सभापती बाबुराव वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना ” माझी अंगणवाडी स्मार्ट अंगणवाडी” म्हणून ओळखली जाऊ लागली.

अंगणवाडी साठी भरीव निधी वायकर यांच्या फंडातून उपलब्ध करून दिल्यामुळेच ह्या पुरस्काराने सन्मानित होण्याच मान भेटला,अश्या शब्दात अर्चना ढोरे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
उपाध्यक्ष रणजित शिवतरे, बांधकाम सभापती प्रमोद काकडे,महिला बालकल्याण सभापती-पूजा पारगे, समाजकल्याण सभापती-सारिका पानसरे,
मा.अध्यक्ष-विश्वास नाना देवकाते,सदस्य-वीरधवल जगदाळे,अर्चना कामठे,भरत नाना खैरे,अति मुख्य कार्यकारी अधिकारी-भारत शेंडगे इत्यादी पदाधिकारी मान्यवर तसेच,पुरस्कर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!