पिंपरी
श्री.संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी स्वहस्तलिखित पारायण सोहळ्याचे करण्यात आले आहे. २डिसेंबर पासून श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचा स्वहस्तलिखित पारायण सोहळा सुरू करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वरी लिखाणासाठी लागणारी ५०० पाणी ग्रंथ वही मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. या शुभ संकल्पात सहभागी होण्यासाठी भाविकांनी नाव नोंदणी करावी असे आवाहन प्रतिभा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विनी लक्ष्मण जगताप व पिंपरी-चिंचवडच्या महापौर माई ढोरे यांनी केले आहे .
भाव धरुनियां वाची ज्ञानेश्वरी !कृपा करी हरी तयावरी !!या उक्तीप्रमाणे ग्रंथराज ज्ञानेश्वरी स्व हस्तलिखित पारायण सोहळा संपन्न होणार आहे .नाव नोंदणीसाठी विजय जगताप ९८८१४९ ७१७२, दत्ता चिंचवडे ९३ २६ ४२ ७७९२, स्मिता जयवंत बागल ९०११३८ ०१०४ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आव्हान संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!