वडगाव मावळ:
देशाचे नेते पद्मविभूषण शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने आमदार चषक फुल पिच क्रिकेटचे आयोजन मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडियाच्या वतीने केले होते .ही स्पर्धा लिग पध्दतीने खेळवली गेली.
पाच दिवस चाललेल्या स्पर्धा बारणे क्रिकेट अँकेडमी पुसाणे येथे पार पडले.वीस संघानी सहभाग नोंदवला .

शेवटच्या दिवशी स्वराज्य स्पोर्ट्स क्लब उर्से विरुद्ध कोंराईन स्पोर्ट्स क्लब कुंरवडे यांच्या अंतिम लढत रंगली. उर्से संघानी प्रथम क्रमांक पटकवला. तर तृतीय क्रमांक इलेव्हन चँलेजर क्लब आढले खु व चतुर्थ क्रंमांक सि सि सिं क्रिकेट क्लब लोणावळा आणी पंचम क्रमांक मुळशी सम्राट कासारसाई यांनी पटकवला.
या स्पर्धेत मँन आँफ द सिरीजचा मानकरी ठरला आढले संघाचा अष्टपैलू खेळाडू विकास जगदाळे ठरला.
स्पर्धचे मुख्य आयोजन मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडिया अध्यक्ष संजय शेडगे यांनी केले होते. आभार नंदकुमार गराडे यांनी व्यक्त केले.

error: Content is protected !!