वडगाव मावळ:
टाळ वीणा मृदुंग गजरात विठ्ठल नामाचा जयघोष करीत लाखो वारकरी आळंदी मध्ये दाखल झाले आहेत वैष्णवांच्या या महामेळाव्याने अलंकापुरी दुमदुमली आहे. माऊली…माऊली …चा जय जय घोष टिपेला पोहोचला आहे.संत माऊली चरणी भाविक मोठ्या श्रद्धेने नतमस्तक होत आहेत.
याच वेळी श्रीक्षेत्र भंडारा डोगर ता.मावळ येथील संत तुकाराम महाराज मंदिर विठ्ठल नामाचा गजर सुरू असून भंडारा डोंगर भक्तीने फुललाय .राज्यभरातील भाविक संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी अलंकापुरी दाखल झालेत. येथे माऊलींचे दर्शन झाल्यावर भाविक देहूत येऊन संत तुकोबारायांचे दर्शन घेतात.
भंडारा डोंगरावर येऊन येथील माती भाळी लावून श्रद्धेने माथा टेकवत आहे. पुणे जिल्ह्यातील आळंदी आणि देहू हे तीर्थक्षेत्र भाविकांच्या श्रद्धेचं मोठं ठिकाण आहे .संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी येणारे भाविकषआळंदीतील मुक्काम आटोपून देहूत आणि भंडारा डोंगरावर येऊन दर्शन घेतात.
येथे विठ्ठल नामाचा जय घोष सुरू असतो .तशाच प्रकारचा सोहळा तुकाराम बीजेला देहूत असतो.देहूत राज्यभरातून आलेले भाविक संत तुकाराम महाराजांचा बीज सोहळा संपन्न झाल्यावर आळंदी जाऊन माऊली चरणी माथा टेकवित आहे. भाविकांच्या सध्याची ही दोन्ही ठिकाणं वैष्णवांच्या श्रद्धेने पावन झालेली आहे. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज महाराष्ट्रातील वैष्णवांचा हृदयात कोरलेली ही दोन्ही नावं अजरामर आहे .
साधा, भोळा ,भाबडा विठ्ठल भक्त श्री विठूरायाची भक्ती करताना माऊलीच्या ओव्या ,तुकोबांच्या अभंग गात लाडक्या विठूरायाची भक्ती करतो .या भक्तीची ठिकाणं भामचंद्र डोंगर असो की,भंडारा डोंगर असो ,देहू असो की आळंदी येथे येऊन भक्तीच्या अवीट सोहळ्यात वारकरी बांधव तल्लीन होऊन जात आहेत भक्तीचा हा अपार महिमा असाच सुरू राहील यात काही नाही.

error: Content is protected !!