वडगाव मावळ:
मावळ तालुक्यातील अतिदुर्गम खांडी केंद्राची शिक्षण परिषद निसर्गरम्य निळशी येथे संपन्न झाली.यावेळी खांडी केंद्राचे केंद्रप्रमूख गंगाराम केदार,खांडी शाळेचे मुख्याध्यापक सुनिल साबळे,डाहूली शाळेचे मुख्याध्यापक यशवंत पवार,तज्ञ संचालक खंडू शिंदे यांसह खांडी केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते.
या शिक्षण परिषदेत RTE कलमे,मुख्याध्यापक कर्तव्ये,शालेय अभिलेखे,अध्ययन स्तर निश्चिती व कृतीपत्रिका इ.विषयी सविस्तर मार्गदर्शन रामेश्वर बागडे यांनी केले.शिष्यवृत्ती परिक्षेतील यशाबद्दल बोरवली शाळेचे मुख्याध्यापक विनायक पारखे व शिक्षिका दिपाली पारखे यांचा सत्कार करण्यात आला.
शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी व नियोजन याविषयी उमेश माळी यांनी मार्गदर्शन केले.गंगाराम केदार यांनी शाळा सुरु होत असताना पाळावयाची शासकीय नियमावली व विद्यार्थ्यांची घ्यावयाची काळजी यांबाबत सुचना दिल्या.यावेळी झालेल्या चर्चेत शिवाजी चौगुले,राहूल राठोड,रुपाली गायकवाड,दत्तात्रय डावखर,राजू वाडेकर यांनी सक्रिय सहभाग घेतला.
शिक्षण परिषदेचे संयोजन निळशी शाळेच्या मुख्याध्यापिका संगिता दाते, दीपाली निमकर व सुवर्णा वाडिले यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुशील कांबळे यांनी तर आभार सुजाता भोसले यांनी मानले.

error: Content is protected !!