कामशेत:
सामाजिक कार्यकर्ते सचिन गायकवाड यांच्या वतीने कामशेतजवळील येवलेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ३४ विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप करण्यात करण्यात आले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा बबलीबाई चित्तोडिया,नेकपालसिंह चित्तोडिया,धरमसिंह चित्तोडिया,शाळेचे मुख्याध्यापक मनोज भांगरे उपस्थित होते.
खेड्यापाड्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये गरीब व होतकरु विद्यार्थी शिक्षण घेतात.शासनाकडून सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात.परंतु अनेक पालकांकडे आर्थिक स्त्रोत उपलब्ध नसल्याने मुलांसाठी वह्या घेणे शक्य होत नाही.वह्यांअभावी शिक्षण प्रक्रियेत खंड पडू नये म्हणून मोफत वह्यावाटप करण्यात आले असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
वह्यावाटपाचा हा निर्णय स्तुत्य असून तो विद्यार्थ्यांना समाधान देणारा असल्याचे मत मुख्याध्यापक मनोज भांगरे सर यांनी व्यक्त केले.सामाजिक बांधीलकी जपून स्वतःच्या प्रपंचातील पैसे विद्यार्थीहीतासाठी वापरणाऱ्या गायकवाड यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

error: Content is protected !!